चंदिगढ, 12 ऑक्टोबर : जगात असा एक दगड आहे, जो मऊ आणि लवचिक असतो, असं (Soft and flexible stone) सांगितलं तर त्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र अशा प्रकारचे दगड अस्तित्वात असून ते मऊ आणि लवचिक असल्याचं दिसून आलं आहे. वास्तविक, कठोर माणसाला पाषाणहृदयी (Rock hearted) असं म्हटलं जातं. दगडाला संबंध कठोरपणाशी असल्यामुळेच हा शब्दप्रयोग वापरला जातो. मात्र दगड हा मऊ आणि रबरासारखा लवचिकदेखील असू शकतो, हे या दगडांकडं पाहिल्यावर दिसून येतं.
इटाकोलुमाईटची वैशिष्ट्यं
या दगडाचं नाव इटाकोलुमाईट असं आहे. या दगडाला पट्ट्यांप्रमाणे कापता येतं. एका रेषेत पट्टीप्रमाणे कापलेले हे दगड मऊ आणि लवचिक असतात. विशेष म्हणजे कितीही वाकवले तरी हे दगड सहसा तुटत नाहीत. सर्वप्रथम हा दगड ब्राझीलच्या मिनास गेराईसमध्ये आढळून आला होता. एखाद्या वस्तूला ती पहिल्यांदा जिथं सापडते, तिथलं नाव मिळतं. तसाच प्रकार या दगडाच्या बाबतीत झाला आहे. हा दगड अमेरिका, जॉर्जिया आणि भारताच्या हरियाणा राज्यातील कलियाना गावात आढळून येतो. रॉक कन्स्ट्रक्शनच्या कामासाठीदेखील या दगडाचा वापर करण्यात येतो. जेव्हा हा दगड पट्ट्यांच्या आकारात कापला जातो, तेव्हा त्याचं खरं सौंदर्य दिसून येतं. या दगडाची अचाट क्षमता पाहून वैज्ञानिक आणि इंजिनिअरदेखील आश्चर्यचकित होतात.
हे वाचा - रात्री 2 वाजता घरात शिरून कॉन्स्टेबलचा महिलेवर Rape; नातेवाईकांनी दिला बेदम चोप
वजनदार पण लवचिक
या दगडाची 30 ते 60 फुटांची पट्टी कापून दोन्ही टोकांना पकडली, तर त्याच्या वजनामुळे ही पट्टी वाकडी होते. अनेकांना ही निसर्गाची जादू आहे, असं वाटतं. निसर्गात आढळणाऱ्या अनेक चमत्कारांपैकी हा एक चमत्कार आहे, असंही अनेकजण मानतात. तर यामागे भूगर्भशास्त्राचा आधार असून काही रासायनिक प्रक्रियांमुळे असे दगड तयार होत असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Brazil, Haryana, Rock on road