• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • देशाचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा संपन्न

देशाचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा संपन्न

देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज पदाची शपथ घेतली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात सरन्यायाधीश जगदिशसिंग खेहर कोविंद यांना पदाची शपथ दिली.

  • Share this:
नवी दिल्ली, 25 जुलै : देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज पदाची शपथ घेतली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात सरन्यायाधीश जगदिशसिंग खेहर कोविंद यांना पदाची शपथ दिली. शपथविधी कार्यक्रमाच्या आधी कोविंद यांनी राजघाटावर जावून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शनही घेतलं.  दुपारी सव्वाबाराच्या सुमारास कोविंद यांनी  राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला सर्व खासदार मंत्री, निवडक मान्यवर आणि नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे कुटुंबीय उपस्थित होते. रामनाथ कोविंद यांची कारकीर्द रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील परौंख गावात झाला कायद्याची पदवी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी दिल्ली उच्च न्यायलयात वकिली केली 1977 ते 1979 पर्यंत दिल्ली उच्च न्यायलयात ते केंद्र सरकारचे वकील होते 1977 मध्ये जनता पार्टीच्या काळात पंतप्रधान मोरारजी देसाईंचे ते खासगी सचिव - 1991 साली भारतीय जनता पार्टीत सक्रीय - भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष आणि नंतर प्रवक्ते - 1994 साली उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवड - 12 वर्षे राज्यसभेचे खासदार - 8 ऑगस्ट 2015 ला बिहारचे राज्यपाल
First published: