'भय्यु महाराजांची आत्महत्या नाही तर हत्या झाली'

'भय्यु महाराजांची आत्महत्या नाही तर हत्या झाली'

'मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही याबात पत्र लिहलं आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवावं असं आवाहन त्यांना केलं आहे'

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जानेवारी : 'भय्यु महाराजांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली असण्याची शक्यता आहे,' असं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आठवलेंनी केली आहे.

'मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही याबात पत्र लिहलं आहे. त् या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवावं असं आवाहन त्यांना केलं आहे,' असंही रामदास आठवले म्हणाले.

काय आहे प्रकरण?

पन्नास वर्षांच्या भय्यू महाराजांनी 12 जून 2018 ला आपल्या निवासस्थानी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. हे आत्महत्येचं प्रकरण आहे असं समजून पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर प्रकरण बंद करण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांचा ड्रायव्हर कैलास पाटील उर्फ भाऊ याला निवेश बडजात्या या वकिलांकडे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने अनेक गौप्यस्फोट केले. आश्रमातले काही लोक महाराजांना ब्लॅकमेल करत होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली होती.त्यानंतर भय्यूजींचा सेवादार पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं.

भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येला सहा महिने उलटून गेले मात्र अजुनही आत्महत्येचं खरं कारण पुढं आलेलं नाही. या प्रकरणी रविवारी इंदूर पोलिसांनी एका संशयीत तरुणीची दिवसभर चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. ही तरुणी आणि महाराजांचा विश्वासू सेवक विनायक दुधाळे याच्या माहितीमध्ये फरक असल्याचं पोलिसांना आढळून आलंय.

त्यामुळं सोमवारीही त्या तरुणीला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं आहे. रविवारच्या चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आलं. संशय वाढल्याने पोलीस तिची आणि विनायकची समोरासोर बसून चौकशी करणार आहेत.

VIDEO : खरंच मोदींनी 15 लाखांचा पहिला हप्ता जमा केला की काय? पाहा स्पेशल रिपोर्ट

First published: January 4, 2019, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading