खेमकरन, 22 ऑगस्ट : गणेशोत्सवाचा देशभरात उत्साह सुरू असतानाच आज दिल्लीतही ISISचा एक दहशतवादी ताब्यात घेतल्यानंतर आणखीन एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. BSF जवानांनी भारतात घुसखोरी करणाऱ्या 5 पाकिस्तानी लोकांना कंठस्नान घातल्याची माहिती मिळत आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच देशावर येणारं विघ्न पोलीस आणि जवानांनी रोखून धरलं आहे.
पंजाबमधील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनं पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 जणांचा खात्मा केला आहे. या 5 पाकिस्तानी घुसखोरांकडून असॉल्ट रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बीएसएफने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
पाकिस्तानी घुसखोर पंजाबमधील सीमारेषेवरून घुसखोरी करत असताना त्यांना BSF जवानांनी पकडलं आहे. पंजाबमध्ये मद्य आणि नशेच्या वस्तू गेल्या काही दिवसांपासून वाढल्याचं लक्षात आल्यानं पोलीस आणि जवान सतर्क झाले होते. पंजाबमध्ये 'बीएसएफ'नं 5 जणांना घातलं कंठस्नान घातलं असून अवैधरित्या सीमा ओलांडताना 'बीएसएफ'ची कारवाई केली आहे. या घुसखोरांकडून एक बॅग आणि एके 47 रायफली जप्त करण्यात आल्या आहेत.
BSF की 103 बटालियन के सैनिकों ने तरन तारन, पंजाब के साथ अंतर्राष्ट्रीय सीमा का उल्लंघन करने वाले घुसपैठियों की संदिग्ध गतिविधि को देखा। रूकने के लिए कहने जाने पर उन्होंने BSF सैनिकों पर गोलीबारी की, उन्होंने आत्मरक्षा में जवाबी कार्रवाई की। जिसमें 5 घुसपैठियों को गोली मारी: BSF
— ANI_HindiNews (@AHindinews) August 22, 2020
हे वाचा-ऑगस्टमध्ये 20 दिवसांत पहिल्यांचा समोर आली कोरोनाची धक्कादायक आकडेवारी
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी बीएसएफच्या जवानांनी काही संशयित लोक तारण तारणच्या खेमकरनमध्ये सीमा ओलांडताना पाहिले. बीएसएफच्या जवानांनी तातडीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र घुसखोरांनी BSF जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनी घुसखोराना चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीदरम्यान 5 घुसखोरांना ठार केलं आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे.
ISISचा कट उधळला, दिल्लीतून एक दहशतवादी ताब्यात
धौलाकुआन रिंग रोड परिसरातून दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आणि ISISचा एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. अब्दुल युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याच्याकडून 2 IED स्फोटकं ताब्यात घेण्यात आली आहेत. पोलीस आणि अब्दुल युसूफमध्ये चकमक झाली. 6 वेळा गोळीबार केल्यानंतर युसूफला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं. हा कोणत्या उद्देशानं आला यासंदर्भात पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.