Home /News /national /

अनेक वर्षांपासून 'या' गावात साजरा होत नाही रक्षाबंधनाचा सण, कारण वाचून बसेल धक्का

अनेक वर्षांपासून 'या' गावात साजरा होत नाही रक्षाबंधनाचा सण, कारण वाचून बसेल धक्का

गेल्या 8 वर्षांत आणि त्या आधीही या गावात रक्षाबंधन साजरा केला नाही अशी माहिती उषा मिश्रा आणि सूर्यनारायण मिश्रा यांनी दिली.

    गोंडा, 01 ऑगस्ट : रक्षाबंध सण म्हटला की बहिण भावाच्या नात्यातला गोडवा आणि सगळे रुसवे फुगवे बाजूला सारुन भावाने बहिणीसाठी रक्षण करण्यासाठी वचन देऊन साजरा कऱण्याचा हा दिवस. भारतात रक्षबंधन हा सण मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. यंदा यावर कोरोनाचं सावट असलं तरीही ऑनलाइन पद्धतीनं किंवा पोस्टल राखी पाठवून हा सण साजरा केला जाणार आहे. मात्र एक गाव असं आहे जिथे रक्षाबंधन या सणाचं नाव जरी उच्चारलं तरीही लोकांच्या अंगावर शहारे येतात. मिळालेल्या माहितीवरून 1955 पासून या गावात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला नाही. 8 वर्षांपूर्वी एकदा मुलींच्या आग्रहापोटी हा सण साजरा करायचं ठरवलं पण तेव्हाही अघटीत घडलं आणि गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे या गावात रक्षाबंधन गेल्या अनेक वर्षांपासून साजरं केलं जात नाही असं सांगितलं जात आहे. हे वाचा-मुंबईकरांनो, कळत-नकळत तुम्ही ही मोठी चूक तर करत नाही ना! उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील भीखमपुर जगतपुरवा या गावात 20 कुटुंब राहतात. ग्राम पंचायतीच्या मुख्य सदस्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की 1955 जेव्हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात होता तेव्हा पूर्वजांपैकी एक जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे हा सण साजरा केला जात नाही. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा जेव्हा मुलींनी हट्ट केला तेव्हा सण साजरा करायचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. रक्षाबंधनाची सगळी तयारी झाली एका मुलीनं आपल्या भावाच्या मनगटावर राखीबांधण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आणि गावावर शोककळा पसरली. दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यानं ग्रामस्थांच्या मनात भीती आहे. त्यामुळे गेल्या 8 वर्षांत आणि त्या आधीही या गावात रक्षाबंधन साजरा केला नाही अशी माहिती उषा मिश्रा आणि सूर्यनारायण मिश्रा यांनी दिली. या गावात रक्षाबंधन या सणाचं नाव काढलं तरीही इथल्या ग्रामस्थांच्या अंगावर काटा येतो आणि गावातील मुलं दुसऱ्या गावात गेली आणि रक्षाबंधना दिवशी आपल्या गावाचं नाव सांगितलं तरीही त्यांना राखी बांधणं टाळलं जातं असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Rakshabandhan, Rakshabandhan special, Uttar pradesh, Uttar pradesh news, Uttar Pradesh Politics

    पुढील बातम्या