नवी दिल्ली, 18 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. या मंत्रिमंडळात निसिथ प्रामाणिक (Nisith Pramanik) यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. प्रामाणिक हे बांगलादेशी नागरिक आहेत. त्यांच्याकडील कागदपत्रांची नीट चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि आसाम प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा (Ripun Bora) यांनी केली आहे. बोरा यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्रच लिहलं आहे. बोरा यांनी हे पत्र ट्विटरवर शेअर केलंय. त्यामध्ये त्यांनी काही वृत्त वाहिन्या आणि वेबसाईटचा हवाला देत प्रामाणिक यांच्यावर हा आरोप केला आहे. ‘प्रामाणिक यांचे जन्मगाव हरिनाथपूर आहे. बांगलादेशमधील गैयबंधा जिल्ह्यात याचा समावेश होता. ते शिक्षणासाठी भारतामध्ये आले होते. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर ते आधी तुणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यानंतर भाजपमध्ये दाखल होत आधी खासदार आणि नंतर मंत्री झाले,’ असा आरोप बोरा यांनी केला आहे. बोरा यांनी काही बातम्यांचा आधार घेऊन आरोप केला आहे की, ’ प्राणाणिक यांनी निवडणूक अर्जामध्ये खोटी माहिती देत त्यांचा पत्ता कुचबिहार जिल्ह्यातील दाखवला आहे. ते मंत्री झाल्यानंतर बांगलादेशमधील त्यांच्या गावातील वातावरण वृत्तवाहिन्यांवर दाखवले आहे. त्या गावातील त्यांच्या मोठ्या भावाने देखील आनंद व्यक्त केला आहे. ‘ही परिस्थिती खरी असेल तर हे एक अतिशय गंभीर प्रकरण आहे. एका विदेशी व्यक्तीला केंद्रीय मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे आपण निसिथ प्रामाणिक यांचे जन्मगाव आणि राष्ट्रीयतेची तपासणी करावी आणि लोकांमधील भ्रम दूर करावा,’ असे ट्विट बोरा यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून केले आहे.
BarakBanglaNews, RepublicTV Tripura, IndiaToday & Business Standard publishes, @NisithPramanik is a Bangladeshi national. Its a matter of grave concern that a foreign national is an incumbent union minister. Urging PM @narendramodi in a letter to conduct an enquiry to clarify it. pic.twitter.com/5Td0xIoG8n
— Ripun Bora (@ripunbora) July 17, 2021
नागपुरात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; धर्मांतर प्रकरणात तिघांची उचलबांगडी भाजपाने फेटाळले आरोप बंगाल भाजपचे सरचिटणीस संयतन बसू यांनी बोरा यांचे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणात विरोधक न्यायालयात जाण्यासाठी स्वतंत्र आहेत असा सल्ल बसू यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री प्रामाणिक यांनी देखील हे आरोप फेटाळले आहेत. एखादा कॅनडामधील खासदार त्या देशात मंत्री झाला आणि त्याच्या भारतामधील नातेवाईकांनी त्याबद्दल आनंद साजरा केला तर त्याचा त्या मंत्रीशी काय संबंध? असा प्रश्न प्रामाणिक यांच्या जवळच्या सूत्रांनी विचारला आहे.