नवा खुलासा : सचिन पायलट यांनी धुडकावली प्रियांका गांधींनी दिलेली ऑफर

नवा खुलासा : सचिन पायलट यांनी धुडकावली प्रियांका गांधींनी दिलेली ऑफर

सचिन पायलट यांच्या नाराजीनंतर चांगलंच राजकीय नाट्य पाहायला मिळालं.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जुलै : राजस्थानमधील दिग्गज नेते सचिन पायलट यांच्या नाराजीनंतर चांगलंच राजकीय नाट्य पाहायला मिळालं. मनधरणीच्या मोठ्या प्रयत्नानंतरही पायलट यांची नाराजी दूर झाली नाही. त्यानंतर अखेर काँग्रेसने त्यांची उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासोबतच्या संभाषणानंतर 3 तासात सचिन पायलट यांची हकालपट्टी करण्यात आली, असा आरोप पायलट गटाकडून केला जात आहे. मात्र या आरोपाला आता काँग्रेसकडून उत्तर देण्यात आल्याची माहिती आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांना फोन करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसंच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून देण्याची ऑफर दिली. मात्र सचिन पायलट यांनी ही ऑफर धुडकावबन लावली.

'मला मुख्यमंत्रिपद देऊन याबाबतची घोषणा सार्वजनिकरित्या करा...अन्यथा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटण्यात काहीच अर्थ नाही,' अशी भूमिका सचिन पायलट यांनी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत 'एनडीटीव्ही'ने वृत्त दिलं आहे.

सचिन पायलट यांच्यावर का केली कारवाई?

अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या षडयंत्रात सहभागी होण्याच्या आरोपाखील सचिन पायलट यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. काँग्रेसने पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन तर त्यांच्या गटाच्या विश्वेंद्र सिंह यांना पर्यटन मंत्री, रमेश मीणा यांना खाद्य मंत्री पदावरुन हटवलं आहे. पायलट आणि काही मंत्री भाजपच्या षडयंत्रात सामिल होऊन राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं.

Published by: Akshay Shitole
First published: July 18, 2020, 10:39 AM IST

ताज्या बातम्या