नवी दिल्ली, 26 मार्च: देशात कोरोनाचे रुग्ण (Coronavirus new rules) वाढत असल्याने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानेही कोरोनाची स्थिती बिकट होत असल्याने काळजी घ्यायचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रासह बहुतेक राज्यांमध्ये होळी साजरी करण्यावर निर्बंध आहेत. पण अशात एका मुख्यमंत्र्यांनी मात्र सार्वजनिक होळीला परवानगी द्यायचा निर्णय घेतला आहे. राजस्थानमधील गहलोत सरकारने (Rajastan Government on holi celebration ) सार्वजनिक ठिकाणी होळी (Holi Celebration during covid-19) खेळण्यास परवानगी दिली आहे. होळी आणि शब-ए-बारातचं सार्वजनिक ठिकाणी (Public Place) आयोजन करण्यास मंजुरी दिली आहे. 28-29 मार्चला संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. आयोजनस्थळी जास्तीत जास्त 50 जणांना उपस्थित राहण्याची मुभा असणार आहे. राजस्थान गृहखात्याने सुधारित आदेश (Revised Order) जारी करत ही माहिती दिली आहे.
नवा आदेश जारी करण्यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी होळी आणि शब-ए-बारात आयोजनावर बंदी घालण्यात आली होती. नागरिकांना घरीच होळी आणि शब-ए-बारात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र आता सरकारने नव्या नियमावलीसह ही बंदी मागे घेतली आहे. जनता आणि सामाजिक संघटनांचा रोष पाहता सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
सरकारने दुपारी 4 नंतर होळी खेळण्याची मंजुरी दिल्याने सार्वजनिक ठिकाणी आयोजनाचा काहीही उपयोग होणार नाही. होळीचे रंग सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खेळले जातात. त्यामुळे या मंजुरीचा तसा उपयोग होणार नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
कलेक्टर आणि एसपींना आदेश जारी
सरकारचा निर्णय झाल्यानंतर गृहखात्याने सर्व कलेक्टर आणि जयपूर-जोधपूर पोलीस आयुक्तांना सुधारित आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे राजस्थान महामारी अधिनियम 2020 आणि आपतकाल प्रतिबंध अधिनियम 2005 या कायद्याची टांगती तलवार नसणार आहे. या आदेशामुळे आता सार्वजनिक ठिकाणी होळी आणि शब-ए-बारात साजरी करता येणार आहे.
देशातील कोरोनामुळे सरकारनं उचललं पाऊल, गृह मंत्रालयाचे राज्यांना निर्देश
दुसरीकडे राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी राज्यात 700हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने जयपूरसहित 8 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावला होता. तसेच दूसऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट देणं अनिवार्य केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Holi 2021