नवी दिल्ली, 26 मार्च : देशभरात कोरोनाचा (Coronavirus in India) कहर वाढत असल्या कारणाने गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश पाठविले आहे. देशातील अनेक भागात रुग्णसंख्या आणि मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी गृहमंत्रालयाने देशभरात निर्देश जारी केले असून राज्य सरकारांना त्याचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आहेत.
देशभरात वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला निर्देश दिले आहेत. आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवांदरम्यान कोरोना प्रोटोकॉलचे सक्तीने पालन करावे, असंही यामध्ये म्हणण्यात आलं आहे. 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे सक्तीने पालन करावे, असंही सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा-नांदेडमध्ये कोरोनाचा कहर, अंत्यविधीसाठी मृतदेह वेटिंगवर
गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार...
-राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी Test-Track-Treat या प्रोटोकॉलनुसार आखणी करावी.
-शाळा, कॉलेज, मल्टिप्लेक्स, जिम, आदी ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं जात आहे की, नाही याकडे अधिक कडकपणे लक्ष दिलं जावं.
-आगामी काळात येणारे सण उदा. होळी, शब-ए-बारात, इस्टर, आदी उत्सवांदरम्यान गर्दी जमा होणार नाही यासाठी स्थानिक पातळीवर आवश्यक पावले उचलली जावीत.
-अशा ठिकाणी फिरताना मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जावेत.
-येत्या काळात सण-उत्सवांदरम्यान गर्दी जमा होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाबरोबरच, पोलिसांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.
-गर्दी वाढण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं गेलं तर कोरोनाची साखळी तोडणं शक्य होणार आहे.
देशभरातून समोर येणारी कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी आहे. दररोज नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात अॅक्विटिव्ह रुग्णांची संख्या (Active Corona Cases in India) आता 4 लाखापेक्षा अधिक झाली आहे. इतकंच नाही तर केवळ ५ दिवसातच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 3 लाखावरुन 4 लाखावर पोहोचली आहे. गुरुवारीदेखील कोरोनाचे 59 हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर आले आहेत. मागील 159 दिवसांमधील ही सर्वात मोठी संख्या आहे. यातील 36 रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील (Corona Cases in Maharashtra) आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates