मराठी बातम्या /बातम्या /देश /

Crime News: 5 रुपयांचं लिंबू खरेदी करणं ग्राहकाच्या जीवाशी, दुकानदारानं घरात घुसून झाडल्या गोळ्या

Crime News: 5 रुपयांचं लिंबू खरेदी करणं ग्राहकाच्या जीवाशी, दुकानदारानं घरात घुसून झाडल्या गोळ्या

तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक पाहून डॉक्टरांनी त्यांना आरबीएम रुग्णालयात रेफर केलं आहे.

    राजस्थान, 03 जून: पाच रुपयांच्या लिंबूवरुन झालेल्या वादात एकाच्या जीवाशी आला आहे. . राजस्थानच्या भरतपूरमध्ये (Bharatpur, Rajasthan) ही घटना घडली आहे. राजस्थानमधील भरतपूरमध्ये 5 रुपयांच्या लिंबू घेण्यावरून दुकानदार (shopkeeper) आणि ग्राहक (Customer) यांच्यातील वाद इतका वाढला की, दुकानदाराने त्याच्या साथीदारांसह ग्राहकावर गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक पाहून डॉक्टरांनी त्यांना आरबीएम रुग्णालयात रेफर केलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. हे प्रकरण भरतपूरच्या डीग पोलीस स्टेशन हद्दीतील बहज गावातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, दिनेश जाटव (30) मुलगा रामजीत हा संध्याकाळी महेंद्र बच्चू यांच्या दुकानात लिंबू घेण्यासाठी गेला होता. जिथून त्याने 100 रुपये देऊन 5 रुपये किमतीचे लिंबू विकत घेतले. सुट्टया पैशाच्या कारणावरून दिनेश आणि महेंद्र यांच्यात वाद आणि शिवीगाळ झाली. यानंतर दुकानदाराचे साथीदार रात्री 8.30 वाजता दिनेशच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला आहे. दिनेशच्या कानाला लागून गोळी निघून गेली. कसला वासच येत नसेल तर हलक्यात नका घेऊ; मेंदूच्या आजारांचे असू शकते लक्षण पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, दुकानदार महेंद्रचा लहान मुलगा भोलू हा काठ्या आणि रॉड घेऊन घरी आला. घरी आल्यानंतरही त्याने त्याला शिवीगाळ केली. आम्ही दिनेशला घराबाहेर पडू दिलं नाही. त्यानंतर धर्मा उर्फ ​​धर्मेंद्र जाट यांचा मुलगा जयवीर नावाच्या बदमाशाने घरावर चार गोळ्या झाडल्या. संधी पाहून धर्माने दिनेशवर गोळी झाडली. डीआयजी सीओ आशिष कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी उशिरा दुकानदार आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. एका दुकानदाराने त्याच्या काही साथीदारांसह ग्राहकावर गोळीबार केला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime, Gun firing, Rajasthan

    पुढील बातम्या