राजस्थान, 25 ऑगस्ट: धौलपुरमध्ये जिल्ह्यात एक हृदयदावक घटना घडली आहे. 23 ऑगस्टला छोटी-छोटी पाच मुलं पार्वती नदीमध्ये (Parvati River) निर्माल्य विसर्जित करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन मुलींचा पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाला आहे. सरपंच राकेश सिकरवार यांनी खाजगी स्तरावर बचावकार्य सुरू करून गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलींचे मृतदेह नदीतून बाहेर काढलेत. त्यानंतर या घटनेची नोंद मानियान पोलीस ठाण्यात करण्यात आली.
पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना मानियान येथील शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवले. त्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
जिनं तिघांना जीवदान दिलं, तिचाच मृत्यू
13 वर्षांची अनुष्का ही पाच जणांमध्ये सर्वात मोठी होती. अनुष्कानं तीन मुलांना जीवदान दिलं. नदीत बुडत असताना तिनं तिघांचे प्राण वाचवले. मात्र शेवटी चुलत बहिण छवीला वाचवताना अनुष्काही बुडाली. त्यात छवी आणि अनुष्काचा मृत्यू झाला.
तालिबानमुळे अफगाणिस्तानच्या उच्चशिक्षित मंत्र्यावर आली पिझ्झा विकण्याची वेळ
समोर आलेल्या माहितीनुसार, खुबी या गावात राहणारी 13 वर्षीय अनुष्का, 7 वर्षीय छवी, 12 वर्षीय खुशबू, 10 वर्षीय पंकज आणि 10 वर्षीय गोविंदा रक्षाबंधनादिवशी झालेला निर्माल्य दुसऱ्या दिवशी विसर्जित करण्यासाठी गावातील अन्य मुलांसोबत पार्वती नदीवर गेले होते.
चौथ्या मुलीला वाचवण्याचा नादात गेला जीव
निर्माल्या विसर्जित करताना छवी, खुशबू, पंकज आणि गोविंदा हे चार मुलं नदीच्या वाहत्या पाण्यात बुडू लागले. तेव्हा अनुष्कानं पाण्यात उडी घेऊन तीन मुलांना पाण्यातून बाहेर काढलं. मात्र शेवटी छोटी मुलगी छवीला वाचवत असताना तिनं अनुष्काला पकडलं. त्यामुळे तिला पोहता आलं नाही. त्यातच दोघींचा मृत्यू झाला. अनुष्का आणि छवी या दोन सख्ख्या भावांच्या एकुलत्या एक मुली होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajstan