मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतासोबतच्या संबंधांमध्ये सुधारणांसाठी पाकिस्तानानं पुन्हा ठेवली काश्मीरची अट, व्यापारासही नकार!

भारतासोबतच्या संबंधांमध्ये सुधारणांसाठी पाकिस्तानानं पुन्हा ठेवली काश्मीरची अट, व्यापारासही नकार!

अशी आशा होती की दोन्ही देशांमधील (India Pakistan) संबंध पुन्हा एकदा सुधारतील. पण आता बातमी आहे की पाकिस्तान पुन्हा एकदा काश्मीरची (Kashmir) मागणी होऊ लागली आहे.

अशी आशा होती की दोन्ही देशांमधील (India Pakistan) संबंध पुन्हा एकदा सुधारतील. पण आता बातमी आहे की पाकिस्तान पुन्हा एकदा काश्मीरची (Kashmir) मागणी होऊ लागली आहे.

अशी आशा होती की दोन्ही देशांमधील (India Pakistan) संबंध पुन्हा एकदा सुधारतील. पण आता बातमी आहे की पाकिस्तान पुन्हा एकदा काश्मीरची (Kashmir) मागणी होऊ लागली आहे.

नवी दिल्ली 02 एप्रिल : फेब्रुवारी महिन्यात भारत-पाकिस्तानच्यामध्ये (India Pakistan) असणाऱ्या नियंत्रण रेषेवरील (LoC) सर्व युद्धविराम (Ceasefire Pact) कराराचे काटेकोरपणे पालन करण्याचे मान्य केले. अशी आशा होती की दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा सुधारतील. पण आता बातमी आहे की पाकिस्तान पुन्हा एकदा काश्मीरची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा तणावपूर्ण होऊ शकतात.

हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पाकिस्तान पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभा आणि लोकसभेच्या विधेयकाद्वारे जम्मू, काश्मीर आणि लडाख यांना स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश बनविण्यात आले. तसेच या भागातून कलम 370 मधील अनेक तरतुदी रद्द केल्या गेल्या आणि कलम 35 A पूर्णपणे रद्द करण्यात आले.

कापूस आणि साखर भारतातून आणण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीच्याने मान्यता दिली होती, मात्र हे इम्रान सरकारने फेटाळले आहे. पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री शिरीन मजरी यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान इम्रान खान यांनी हे स्पष्ट केले आहे की भारतासोबतचे संबंध तेव्हापर्यंत पूर्ववत होणार नाहीत जोपर्यंत 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा परत दिला जात नाही.

याआधी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला पत्र लिहित राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावर पंतप्रधान इम्रान खान यांचं उत्तरही आलं होतं. दोन्ही देशातील संबंध पुन्हा सुधारत असून लवकरच दोन्ही देशात व्यापारही सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार इम्रान सरकारनं व्यापारास नकार दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Jammu and kashmir, Pak pm Imran Khan, Pakistan