Home /News /national /

2 दिवसांपासून दरीत अडकलेल्या 'बाबू'ची सुटका, लष्कराच्या rescue operation थरारक Video

2 दिवसांपासून दरीत अडकलेल्या 'बाबू'ची सुटका, लष्कराच्या rescue operation थरारक Video

Shocking news: केरळमध्ये दोन दिवसांपासून (Man Trapped between 2 Hills) डोंगरात अडकलेल्या तरुणाला सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे. त्याला आता थेट रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

    तिरुवनंतपुरम, 09 फेब्रुवारी: केरळमधील पलक्कड (Palakkad, Kerala) येथील कुरमबाची डोंगराच्या फॉल्ट (Fault Line) लाइन (खड्डा,दरी) मध्ये अडकलेल्या (Trapped) 23 वर्षीय तरुणाची सुटका करण्यात आली आहे. केरळमध्ये तीन दिवसांपासून (Man Trapped between 2 Hills) डोंगरात अडकलेल्या तरुणाला सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे. त्याला आता थेट रुग्णालयात नेण्यात आलं आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या संयुक्त रेस्क्यू ऑपरेशननंतर दोन डोंगराच्या दरीत अडकलेल्या तरुणाला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं आहे. कसा अडकलेला तरुण दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये ट्रेकिंगला गेलेल्या आर बाबू नावाच्या तरुणाचा पाय घसरला आणि तो दोन डोंगराच्या दरीत जाऊन अडकला. आर बाबू असं अडकलेल्या तरुणाचं नाव असून तो मलमपुझा येथील चेराडूतला रहिवासी आहे. सोमवारी दुपारी केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एलाचिराम येथे जवळच्या कुरुंबाची डोंगरावरून खाली उतरत असताना दरीच्या खड्डयात पडला. आर बाबू आणि इतर तीन मित्र डोंगरावर जात असताना ही घटना घडली. मित्रांनी केला वाचवण्याचा प्रयत्न आर बाबू पडल्यानंतर त्याच्या मित्रांनी प्रथम त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश न आल्याने त्यांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. सोमवारी रात्रीपर्यंत यश न मिळाल्याने मंगळवारी पुन्हा प्रयत्न करण्यात आलं मात्र यश आलं नाही. 2 दिवस होता उपाशी हा तरुण अडकून 43 तासांहून अधिक काळ लोटला होता मात्र त्याला बचावकर्ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नव्हते किंवा त्याला अन्न-पाणीही पुरवू शकलेले नव्हते. जवळपास दोन दिवस आर बाबूला अन्न-पाणीही मिळाले नाही. यानंतर स्थानिक आमदार ए. प्रभाकरन यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हा मंत्री कृष्णनकुट्टी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. बचावकार्यात आल्या अडचणी आर बाबूच्या बचावासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) सोबत अनेक पथके गुंतली होती. मात्र थेट डोंगरावर चढणं शक्य नव्हते. यादरम्यान मंगळवारी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली, मात्र यश आलं नाही. सर्व आधुनिक उपकरणांसह लष्कराचे तज्ज्ञ बचाव कार्यासाठी मलमपुझा येथील चेराड हिलवर पोहोचले होते. तरुणाला वाचवण्यासाठी दोन लष्करी अधिकारी, दोन जेसीओ आणि इतर पाच कॉन्स्टेबल काल रात्री वेलिंग्टन येथून घटनास्थळी पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांनी मागितली लष्कराची मदत मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनीही मध्यस्थी करत तरुणांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराची (Indian Army) मदत घेतली. यानंतर बंगळुरूहून हवाई दल आणि लष्कर मदतीसाठी पोहोचले. जिल्हा प्रशासनाकडूनही मदत घेण्यात आली होती. दक्षिण भारताचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC), लेफ्टनंट जनरल ए अरुण यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती दिली कि, बचाव कार्यासाठी एक विशेष टीम पलक्कडला रवाना झाली होती. लष्करानं केलं रेस्क्यू ऑपरेशन यानंतर बेंगळुरू आणि वेलिंग्टन येथून आर्मी टीम आणि इंडियन एअर फोर्स व्यतिरिक्त काही गिर्यारोहक टीम मदतीसाठी पोहोचली. सर्व प्रथम बाबूला अन्न आणि पाणी पाठवण्यात आलं. यानंतर लष्कराच्या तज्ज्ञांनी बचाव कार्यासाठी आधुनिक उपकरणे आणि दोरीच्या साहाय्याने बाबूची सुटका केली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Heartbreaking, Incident, Indian army, Kerala, Shocking viral video

    पुढील बातम्या