भारतीय रेल्वे हे आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. एवढेच नाही तर एकल सरकारी मालकीच्या बाबतीत भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या 8000 च्या जवळपास आहे. यात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत, जी खूप प्रसिद्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच एका अनोख्या रेल्वे स्टेशनबद्दल सांगणार आहोत, ज्याची स्वतःची कोणतीही ओळख नाही. हो, या स्टेशनला नाव नाही आहे. बोर्ड पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य या रेल्वे स्थानकावर कोणताही प्रवासी उतरले की, हा फलक पाहून या स्थानकाचे नावच नाही, असा गोंधळ उडतो. अनेक वेळा लोकांना समजत नाही की ते योग्य स्टेशनवर उतरले आहेत की नाही. ‘प्रदेश लाईव्ह डॉट कॉम’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये आहे स्टेशन - हे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे, ज्या स्टेशनला नाव नाही. हे स्टेशन पश्चिम बंगालमधील वर्धमानपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. बांकुरा-मसग्राम रेल्वे मार्गावर वसलेले हे स्थानक रैना आणि रायनागढ या दोन गावांमध्ये येते. या दोन गावांमधील वादामुळे या स्थानकाला आजतागायत नाव मिळाले नाही. शेतकऱ्याच्या लेकीचा कौतुकास्पद निर्णय! 17 वर्षांची शुभावरी करतेय सेंद्रिय शेती
रेल्वेने हे रेल्वे स्थानक 2008 मध्ये तयार केले होते आणि त्यावेळी सुरुवातीला हे स्थानक रायनगर म्हणून ओळखले जात होते. रैना गावातील लोकांना ही गोष्ट आवडली नाही कारण या स्टेशनची इमारत रैना गावाच्या जमिनीवर बांधण्यात आली होती. या स्थानकाचे नाव रैनागड ऐवजी रैना असावे असे रैना गावातील लोकांचे मत होते.
यावरून दोन ग्रामस्थांमध्ये वाद सुरू झाला. आता स्थानकाच्या नावाचा वाद रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचला आहे. या भांडणानंतर भारतीय रेल्वेने येथील सर्व फलकांवरून स्थानकाचे नाव पुसून टाकले, त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बोर्ड अजूनही रिकामा - स्थानकाला स्वतःचे नाव नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, अजूनही रायनगर या जुन्या नावाने या स्टेशनसाठी तिकीट मिळते.