राहुल गांधी आदिवासीच्या मुलांना करणार ‘स्मार्ट’; कोरोना काळात सुरू केली नवी योजना

राहुल गांधी आदिवासीच्या मुलांना करणार ‘स्मार्ट’; कोरोना काळात सुरू केली नवी योजना

लॉकडाऊनच्या काळात आदिवासी मुलांना याची मोठी मदत होईल, असे सांगितले जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 2 जुलै : काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या संसदीय जागेवरील आदिवासी मुलांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी स्मार्ट टेलिव्हिजन उपलब्ध करुन दिले आहेत. वायनाड जिल्हा प्रशासनाला राहुल गांधी यांनी 175 स्मार्ट टीव्ही दिले आहेत.

वास्तविक, लॉकडाऊन लक्षात घेता मुलांच्या ऑनलाइन वर्गासाठी केरळ सरकारने 'फर्स्ट बेल' नावाची योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत मुलांना ऑनलाईन शिकवले जाणार आहे. या प्रयत्नात राहुल गांधींनी राज्य सरकारचेही समर्थन केले आहे.

हे वाचा-जुलैमधील JEE आणि NEET च्या परीक्षा रद्द होणार? HRD मंत्र्यांनी दिलं उत्तर

2019 मध्ये प्रथमच वायनाडमधून लढवली निवडणूक

विशेष म्हणजे, 2019 मध्ये राहुल गांधींनी आपल्या राजकीय जीवनात प्रथमच केरळमधील वायनाड सीटवरुन लोकसभा निवडणूक लढवली. 2004 नंतर ते उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदार संघातून परंपरेने निवडणुका जिंकत होते. 2019 मध्ये वायनाड सीटवरुनही निवडणूक लढविण्याच्या अनेक राजकीय अनुमानांचा त्यांनी विचार केला होता.

असे म्हणतात की त्यांना अमेठीतील पराभवाची भीती होती. यामुळे त्यांनी वायनाड जागेवरुन निवडणूक लढवली.  काही राजकीय विश्लेषक म्हणाले की, राहुल गांधींना दक्षिण भारतात कॉंग्रेसचा प्रचार बळकट करायचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राहुल गांधी अमेठी येथून निवडणूक हरले आणि वायनाड जागेवरुन विजयी झाले.

हे वाचा-VIDEO : कोरोनामुळे झाला मृत्यू, दफनासाठी 500 मीटर खेचत नेला मृतदेह

अमेठीतून राहुल यांचा पराभव हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठी बाब ठरली. परंतु, पारंपारिक जागा गमावणारे ते कॉंग्रेसचे एकमेव नेते नव्हते. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना जागा गमवाव्या लागल्या आहेत.

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: July 2, 2020, 5:33 PM IST

ताज्या बातम्या