अंबाला : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला खूप मोठा आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात यश आलं. आता राहुल गांधींनी आपला मोर्चा ट्रक ड्राव्हर्सकडे वळवला आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चक्क ट्रकने प्रवास केला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्रकमधून प्रवास केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राहुल गांधींच्या या कृतीचं समर्थन करणारे अनेक ट्विट समोर आले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रकमधून प्रवास करताना दिसले. राहुल गांधी दिल्लीहून शिमल्याला रवाना झाले. वाटेत अंबाला ते चंदिगड असा ट्रकने प्रवास केला.
कर्नाटक विजयानंतर काँग्रेस अॅक्टिव मोडवर; विधानसभा निवडणुकांचा प्लॅन आला समोर, भाजपचं टेन्शन वाढलं!Rahul Gandhi in a truck. Talking and listening to the problems of drivers at late night ❣️ pic.twitter.com/V3TlBuArDM
— Darshni Reddy (@angrybirdtweetz) May 22, 2023
काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राहुल ट्रकमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सोमवारी रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल यांनी अंबाला येथे ट्रक चालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाहनचालकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राहुल गांधींनी सोडला सरकारी बंगला, घराबाहेर पडताना कर्मचाऱ्यांसोबत काय केलं? Videoकाँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी राहुल यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं की, देशातील वेगवेगळ्या स्तरावरील लोकांच्या त्यांना समजून घ्यायच्या आहेत त्यामुळे राहुल गांधी अशा पद्धतीने प्रत्येक अडचणी समजून घेत आहेत. कोणीतरी आहे जो लोकांच्या पाठीशी उभा आहे.
कोणीतरी आहे जो त्यांच्या उद्याच्या चांगल्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहे. कोणीतरी आहे जो द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडत आहे. आणि हळुहळू हे लक्षात येत आहे की या देशाला प्रेम आणि शांततेच्या मार्गावर परतायचे आहे, हळूहळू हा देश राहुल गांधींच्या बरोबर वाटचाल करायला लागला आहे.