जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राहुल गांधींनी सोडला सरकारी बंगला, घराबाहेर पडताना कर्मचाऱ्यांसोबत काय केलं? Video

राहुल गांधींनी सोडला सरकारी बंगला, घराबाहेर पडताना कर्मचाऱ्यांसोबत काय केलं? Video

राहुल गांधींनी सोडला सरकारी बंगला, घराबाहेर पडताना कर्मचाऱ्यांसोबत काय केलं? Video

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज त्यांचा 12, तुगलक लेनचा सरकारी बंगला सोडला आहे. याआधी राहुल गांधींनी 14 एप्रिलला त्यांचं कार्यालय आणि काही सामान या बंगल्यातून सोनिया गांधी यांच्या अधिकृत घरी पाठवलं होतं.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 एप्रिल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज त्यांचा 12, तुगलक लेनचा सरकारी बंगला सोडला आहे. याआधी राहुल गांधींनी 14 एप्रिलला त्यांचं कार्यालय आणि काही सामान या बंगल्यातून सोनिया गांधी यांच्या अधिकृत घरी पाठवलं होतं. राहुल गांधी यांना हा बंगला खासदार म्हणून देण्यात आला होता. जवळपास दोन दशकं राहुल गांधी या बंगल्यात राहत होते. एका ट्रकमधून राहुल गांधींच्या बंगल्यातलं सामान त्यांची आई सोनिया गांधींच्या घरी पाठवण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यालय बदलल्यानंतर राहुल गांधी त्यांच्या आई सोनिया गांधींसोबत 10, जनपथच्या घरी राहत होते. सूरतच्या न्यायालयाने 23 मार्चला राहुल गांधींना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी धरलं होतं आणि त्यांना 2 वर्ष शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. खासदारकी रद्द झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना 22 एप्रिलपर्यंत बंगला खाली करायला सांगितला. बंगला खाली करताना राहुल गांधींनी तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत हस्तांदोलन केलं, तसंच बंगल्याची चावीही त्यांनी कर्मचाऱ्यांकडे दिली. तुगलक लेनचा बंगला सोडताना राहुल गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपालही होते.

जाहिरात

हिंदुस्तानच्या नागरिकांनी मला 19 वर्ष हा बंगला दिला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सत्य बोलण्याची ही किंमत आहे, पण खरं बोलण्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असं राहुल गांधी बंगला सोडल्यानंतर म्हणाले.

राहुल गांधींनी सूरतच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निकालाला आव्हान दिलं, ज्यात त्यांनी शिक्षा रद्द करण्याची मागणी केली, पण ही मागणी रद्द करण्यात आली. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला काँग्रेस पक्ष पुढच्या आठवड्यात गुजरात हायकोर्टात आव्हान देणार आहे. काही वर्षांपूर्वी प्रियंका गांधी वाड्रा यांचीही एसपीजी सुरक्षा हटवण्यात आली, त्यानंतर त्यांना लोधी इस्टेटमधला त्यांचा बंगला खाली करायला सांगण्यात आलं होतं. राहुल गांधी 2004 साली पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून खासदार झाले. 2019 साली त्यांचा केरळच्या वायनाड मतदारसंघातून विजय झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात