मुंबई, 19 मार्च : भारतामध्ये 2020 साली दक्षिण आशियातील सर्व देशांपेक्षा बालमृत्यू प्रमण (highest rise in child mortality) वाढल्याची भीती युनिसेफ (Unicef) संस्थेच्या ताज्या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशातील आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाल्यानं हे प्रमाण वाढल्याचा अंदाज या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. काय आहे रिपोर्ट? दक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या सहा सर्वाधिक लोकसंख्येच्या देशातील पाहणींच्या आधारे या रिपोर्टमध्ये निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस महामारीचा (impact of Covid-19) हॉस्पिटल, आयसीयू वॉर्डातील परिस्थिती यावर मोठे परिणाम झाला. त्यामुळे गर्भवती महिला तसंचे बालमृत्यचे प्रमाण सर्वाधिक झाले. कोरोना महामारीचा फटका बसलेल्या सर्व देशांमध्ये शिक्षण आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचा निष्कर्ष या रिपोर्टमध्ये काढण्यात आला आहे. आधुनिक गर्भनिरोधक यंत्रणांचा अभाव असल्यानं दक्षिण आशियामध्ये 3.5 दशलक्ष अनपेक्षित गर्भधारणा होतील, असा अंदाज या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये एकट्या भारतामध्ये 3 दशलक्ष गर्भधारणा होण्याती शक्यता आहे. यामुळे तरुण कुटुंबातील महिलांच्या गर्भधारणेमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण भारतामध्ये वाढण्याची भीती आहे. भारतानंतर पाकिस्तानमध्ये या प्रकारचे सर्वाधिक मृत्यू होतील. शिक्षणावरही परिणाम ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावरही कोरोना महामारीचा मोठा परिणाम झाल्याचा निष्कर्ष यामध्ये काढण्यात आला आहे. बराच काळ शाळा बंद राहिल्याने दक्षिण आशियातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील 9 दशलक्ष मुलांची शाळा कायमची सुटण्याचा अंदाज आहे. एकट्या भारतामध्ये हे प्रमाण 7 दशलक्ष असेल, असे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. (हे वाचा- बापरे! कोरोनानंतर अंदमानमध्ये पसरतोय भयंकर सुपरबग; कोणत्याच औषधाला देत नाही दाद ) राहुल गांधींची सरकारवर टीका युनिसेफचा हा धक्कादायक रिपोर्ट जाहीर होताच त्यावर राजकारण सुरु झाले आहे. ‘अनियोजित लॉकडाऊनमुळे देशात ही परिस्थिती निर्माण झाली,’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
The unplanned lockdown disaster continues to haunt the country.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 19, 2021
Condolences to the lakhs of families being punished with indescribable pain for GOI’s incompetence & myopia. pic.twitter.com/TBN7mS149W
राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर थेट टीका केली आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर लवकरच सरकार विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहयला मिळण्याची शक्यता आहे.