• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राहुल गांधींनी केलं केवळ दोन शब्दांचं Tweet, EVM प्रकरणावरुन निवडणूक आयोगावर निशाणा

राहुल गांधींनी केलं केवळ दोन शब्दांचं Tweet, EVM प्रकरणावरुन निवडणूक आयोगावर निशाणा

निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीदेखील पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर (Election Commission) निशाणा साधला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 04 मार्च : बंगाल आणि आसामसह पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूका (Assembly Election 2021) सुरू आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीदेखील पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर (Election Commission) निशाणा साधला आहे. केवळ दोन शब्दांचा वापर करत निवडणूक आयोगावर साधलेल्या निशाण्याचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं, की इलेक्शन 'कमिशन'. त्यांच्या या कमिशन शब्दात मोठा अर्थ दडला आहे. याच्या एक दिवस आधीही राहुल यांनी ट्विट करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटलं होतं, निवडणूक आयोगाची गाडी खराब, भाजपची नियत खराब आणि लोकतंत्राची हालत खराब. प्रियांका गांधी वाड्रा यांनीही केली टीका - याआधी काँग्रेस नेत्या आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनीही आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीमध्ये ईव्हीएम आढळून आल्याच्या प्रकरणावरुन निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं, भाजप उमेदवाराच्या गाडीमध्ये आढळलेल्या ईव्हीएमप्रकरणी निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाईची आम्ही प्रतिक्षा करत होतो. मात्र, आयोगाची पाऊलं पाहाता त्यांनी आपल्या नियमांच्या पुस्तकातून आणखी एक निष्पक्षतावालं पान फाडलं असल्याचं दिसत आहे. याआधी प्रियांका गांधी वाड्रा यांनी कारचा एक व्हिडीओही ट्विट केला होता. सुरुवाती तपासात असं समोर आलं, की ज्या गाडीमध्ये ईव्हीएम सापडलं ती भाजपचे पाथरकांडी विधानसभेचे भाजप उमेदवार कृष्णेंदु पाल यांची होती. विशेष बाब म्हणजे या गाडीमध्ये निवडणूक आयोगाचा एकही अधिकारी नव्हता.
  Published by:Kiran Pharate
  First published: