नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत (Lok Sabha) भाषण (Speech) करताना केलेली एक चूक (Mistake) त्यांना चांगलीच महागात पडली. त्यांची चूक लक्षात आणून देत लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) ओम बिर्ला (Om Birla) यांनी त्यांना फटकारले आणि आपल्या अधिकारात येणाऱ्या गोष्टी स्वतः न करण्याचा सल्लाही दिला. राहुल गांधींनी मोदी सरकारवर कडाडून टीका करणारं भाषण देशभर गाजत असतााच हा प्रसंगही चांगलाच चर्चेत राहिला. झाली ‘ही’ चूक राहुल गांधी लोकसभेत भाषण करत असताना त्यांनी भाजप खासदार कमलेश पासवान यांच्या नावाचा उल्लेख केला. पासवान यांनी याला आक्षेप घेत जागेवर उभं राहत राहुल गांधी यांचा मुद्दा खोडून काढायला सुरुवात केली. ते पाहून राहुल गांधींनी आपण लोकशाही मानणारे खासदार आहोत, असं सांगत इतर व्यक्तींनाही बोलण्याची परवानगी देत असतो, असं म्हटलं. राहुल गांधींच्या या वक्तव्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला. परवानगी देण्याचा अधिकार माझा लोकसभेत कुणाला बोलण्याची परवानगी द्यायची आणि कुणाला नाही, हा माझा अधिकार असल्याचं ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना ठणकावून सांगितलं. तुम्हाला घटनेनं तो अधिकार दिलेला नसल्यामुळे तुम्ही या सभागृहात कुणालाही बोलण्याची परवानगी देऊ किंवा नाकारू शकत नाही, असं म्हणत ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची शाळा घेतली. हे वाचा- ट्रकचालकांच्या आंदोलनात कुठून येतायत बंदुका? पोलिसांनी दिली Warning राहुल गांधींकडून सरकारवर टीका बुधवारी लोकसभेत केलेल्या भाषणात राहुल गांधींनी सरकारवर कडाडून टीका केली. सध्या श्रीमंतांचा आणि गरीबांचा असे दोन भारत निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देशातील ठराविक उद्योगसमूह श्रीमंत होत असून छोटे आणि मध्यम उद्योग सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डबघाईला आले असल्याचं त्यांनी सांगितलं. नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीनं झालेली जीएसटीची अंमलबजावणी आणि कोरोना लॉकडाऊन काळात सरकारनं अंगिकारलेली चुकीची धोरणं यामुळे देशाची अवस्था बिकट झाल्याचं ते म्हणाले. बेरोजगारी हा देशातील सर्वात मोठा प्रश्न असताना राष्ट्रपतींच्या अभिभाषणात त्याचा उल्लेखही न झाल्याबद्दल राहुल गांधींंनी आश्चर्य व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.