नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झाले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा एकतर्फी पराभव केला. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या विजयानंतर सोनिया गांधी या त्यांना भेटायला गेल्या. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचं निवासस्थान असलेल्या 10 राजाजी मार्ग इकडे जाऊन त्यांचं अभिनंदन केलं.
दरम्यान भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांना मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्ष झाले आहेत, आता तुमची भूमिका काय? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आपल्या भवितव्याचा निर्णय मल्लिकार्जुन खर्गे घेतील, मी खर्गे यांना रिपोर्ट करणार आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस अध्यक्ष झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मल्लिकार्जुन खर्गेंचं नव्या जबाबदारीबद्दल अभिनंदन, त्यांना कार्यकाळात यश मिळो, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
My best wishes to Shri Mallikarjun Kharge Ji for his new responsibility as President of @INCIndia. May he have a fruitful tenure ahead. @kharge
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2022
24 वर्षांनंतर गांधी कुटुंबाच्या बाहेरची व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष झाली आहे. खर्गे सोनिया गांधींची जागा घेणार आहेत. सोनिया गांधी जवळपास दोन दशकं काँग्रेस अध्यक्षा होत्या. खर्गे यांना अत्यंत कठीण काळात काँग्रेसचं नेतृत्व मिळालं आहे. देशातला सगळ्यात जुना पक्ष असलेली काँग्रेस 137 वर्षांच्या इतिहासात अस्तित्वाची लढाई लढत आहे.
मल्लिकार्जुन खर्गे, ज्यांच्यामुळे झाला फडणवीस-पवारांचा शपथविधी, नेहरू सेंटरमधली Inside Story
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi