राहुल गांधींनी आपल्या आजीला भेटायला जाण्यात गैर काय? काँग्रेसनं दिलं भाजपच्या टीकेला उत्तर

राहुल गांधींनी आपल्या आजीला भेटायला जाण्यात गैर काय? काँग्रेसनं दिलं भाजपच्या टीकेला उत्तर

राहुल गांधी हे रविवारी सकाळी कतार एअर वेजच्या विमानाने इटलीतल्या मिलानला गेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ते नेमके कधी परत येणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 28 डिसेंबर: काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विदेश दौऱ्यावरून भाजपने (BJP) टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी हे सध्या इटलीतल्या मिलानमध्ये आपल्या आजीची भेट घेण्यासाठी गेले आहेत. या आधीही राहुल यांच्या विदेश दौऱ्यावरून सोशल मीडियावरही जोरदार टीका करण्यात आली होती. आता या टीकेला काँग्रेसने उत्तर दिलं आहे. राहुल हे आपल्या आजीला भेटायला गेले यात गैर काय आहे असा सवाल काँग्रेसने केला आहे. भाजप अतिशय खालच्या स्तराचं राजकारण करत असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी केली आहे.

काँग्रेस सोमवारी आपला 136वा वर्धापन दिन साजरा करत आहे. याच कार्यक्रमाला राहुल गांधी नसल्याने चर्चेत भरच पडली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, राहुल गांधी हे विदेश दौऱ्यावर आहेत. लवकरच ते परतणार आहेत. प्रत्येकाला वयक्तित दौऱ्यावर जाण्याचा अधिकार आहे.

स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केरत कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. देश हितासाठी आवाज उठवण्यास काँग्रेस कायम अग्रेसर राहिली आहे. सत्य आणि समानतेसाठी आमचा आवाज कायम बुलंद असेल याची आम्ही ग्वाही देतो असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी हे रविवारी सकाळी कतार एअर वेजच्या विमानाने इटलीतल्या मिलानला गेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ते नेमके कधी परत येणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र 31 डिसेंबरनंतरच ते येणार आहेत असंही बोललं जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 28, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या