‘COVID19विरुद्ध भारत मारणार का बाजी? देशात सुरू आहे 40 पेक्षां जास्त लसींवर संशोधन

 ‘COVID19विरुद्ध भारत मारणार का बाजी? देशात सुरू आहे 40 पेक्षां जास्त लसींवर संशोधन

'सध्या दररोज 15,747 टेस्ट करण्यात येत असून त्यापैकी 584 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 12 एप्रिल : कोरोनाविरुद्ध औषध नसल्याने जग सध्या हतबल झालं आहे. जगभर मृत्यूची संख्या वाढत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी तातडीने औषधाची गरज आहे. त्यामुळे जगातले मेडिकल फिल्डमधले सर्व शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. भारतातही अनेक संस्था आणि सरकारी रिसर्च लॅबमध्ये यावर संशोधन सुरू आहे. देशात 40 पेक्षा जास्त लसींवर संशोधन सुरू असल्याची माहिती ICMRचे डॉ. मनोज मुऱ्हेकर यांनी दिली.

पण हे संशोधन पहिल्या टप्प्यात आहे. त्यामुळे सध्यातरी त्यावर औषध सापडल्याचा दावा करता येणार नाही असही त्यांनी सांगितलं. सध्या दररोज 15,747 टेस्ट करण्यात येत असून त्यापैकी 584 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

केंद्रीय आयुष मंत्रालयाने आता कोरोनावर उपाय शोधण्यासाठी टास्क फोर्स तयार तयार केला आहे. आयुष मंत्रालय आणि ICMR मिळून हे संशोधन करणार आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यामुळे वेगळ्या अंगाने काही संशोधन करता येऊ शकते का याचं संशोधन हा टास्क फोर्स करणार आहे.

आयुर्वेदीक आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून वैज्ञानिक आणि आयुर्वेदीक-होमिओपॅथिक डॉक्टर्स यावर उपाय शोधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आयुष मंत्रालयाला सूचना केली होती.

4 वर्षांच्या मुलीला कोरोना, पोलिसांनी आई-वडिलांवर दाखल केला गुन्हा

गेल्या 24 तासांमध्ये देशात 918 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 31 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे   देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 8447 वर गेली आहे. 29 मार्चला ही संख्या फक्त 979 एवढी होती. यातल्या 20 टक्के रुग्णांना ICUमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यात 1671 रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागत असून त्यातल्या अनेकांची प्रकृती क्रिटिकल असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये पोलिसाने केलेल्या मारहाणीत आलं अंधत्व, तरुणाकडून न्यायाची मागणी

सध्या आपल्याला 1,671 एवढ्या बेड्सची गरज असताना आपल्याकडे 1 लाख 5 हजार बेड्स तयार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सोशल डिस्टन्सिंगशिवाय कोरोनावर दुसरा उपाय नाही असंही ते म्हणाले.

 

 

First published: April 12, 2020, 6:04 PM IST

ताज्या बातम्या