Home /News /national /

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, कॅप्टन अमरिंदर सिंह मुख्यमंत्रीपद सोडण्याची शक्यता

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, कॅप्टन अमरिंदर सिंह मुख्यमंत्रीपद सोडण्याची शक्यता

Punjab Congress Crisis: पंजाबमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी राजकीय खळबळ उडाली आहे.

    चंदीगड, 18 सप्टेंबर: पंजाबमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (Punjab Congress Meeting) बैठकीपूर्वी राजकीय खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Punjab Chief Minister Amarinder Singh) यांची मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची देण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंह यांची खदखद बाहेर पडली. पंजाबमधील 50 पेक्षा जास्त काँग्रेस आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पंजाबच्या नेतृत्वात बदल करणार असल्याची चर्चा सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत, ज्यांच्या बाजूने बहुमत असेल, ते राज्याचा कारभार स्वीकारतील. जर कॅप्टन यांच्याकडे बहुमत नसेल, तर मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय लगेच घेतला जाईल. तसंच पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुनील जाखड, सुखजिंदर रंधवा आणि प्रताप सिंह बाजवा यांची नावे आघाडीवर आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता चंदीगडच्या सेक्टर 15 येथील काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होत असल्याने या बैठकीत नेमकं काय होतंय, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अफगाणिस्तानबाबत भारताची भूमिका काय?, पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट सोनिया गांधींकडे व्यक्त केली नाराजी अमरिंदर सिंह यांनी सोनिया गांधींशी फोनवर चर्ता केली. यावेळी त्यांच्या झालेल्या अपमानाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आतापर्यंत अशा प्रकारचा अपमान खूप झाला. असा अपमान सहन करत मी पक्षात राहू शकत नाही. मात्र सध्या अमरिंदर यांची सोनिया गांधी यांच्याशी बोलत असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ''2.5 कोटी लोकांनी लस घेतली, पण ताप आला एका पक्षाला''; मोदींची मिश्किल टीका पंजाबमध्ये आज होणारी आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीस सर्व आमदारांनी हजर राहणं बंधनकारक आहे असा आदेश पक्षाकडून काढण्यात आला आहे. या बैठकीसाठी पर्यवेक्षक म्हणून हरीश रावत आणि अजय माकन उपस्थित राहणार आहेत. नवज्योतसिंग सिद्धूच्या समर्थकांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करत आहे. तर केंद्रीय निरीक्षकांकडे मुख्यमंत्र्यांसाठी मतदान करण्याची मागणी करणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सिद्धू समर्थक आमदार आणि मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांचे नाव पुढील विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून पुढे करू शकतात. कॅप्टन अमरिंदर सिंह समर्थक कॅप्टन यांच्या बाजूनं किमान 60 आमदारांना मतदान करण्यासाठी तयारी करत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Congress, Punjab

    पुढील बातम्या