मराठी बातम्या /बातम्या /देश /

सुवर्ण मंदिरात घुसखोरी करणारा तरुण 'या' राज्यातला, जमावानं केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू

सुवर्ण मंदिरात घुसखोरी करणारा तरुण 'या' राज्यातला, जमावानं केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू

शीखांचे सर्वात मोठे धर्मस्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात (Golden Temple)  शनिवारी एका तरुणाची हत्या (young man was killed) करण्यात आली.

शीखांचे सर्वात मोठे धर्मस्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात (Golden Temple) शनिवारी एका तरुणाची हत्या (young man was killed) करण्यात आली.

शीखांचे सर्वात मोठे धर्मस्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात (Golden Temple) शनिवारी एका तरुणाची हत्या (young man was killed) करण्यात आली.

  • Published by:  Pooja Vichare

अमृतसर, 19 डिसेंबर: शीखांचे सर्वात मोठे धर्मस्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात (Golden Temple) शनिवारी एका तरुणाची हत्या (young man was killed) करण्यात आली. मूळच्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) या तरुणाने सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिबचा (Guru Granth Sahib) अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे ठेवलेले श्रीसाहेब (साबर) उचललं होतं. यानंतर लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर सुवर्ण मंदिरातील वातावरण चांगलेच तापलं आहे. संतप्त जमावाने शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तरुणाचा मृतदेह दाखवा, मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, असे त्यांचं म्हणणं आहे. अमृतसरचे डीसीपी परमिंदर सिंह भंडल यांनी सांगितले की, तरुणाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

दर्शन लाईनमध्ये उभा होता तरुण

सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येत आहे की, हा तरुण दर्शन घेणाऱ्या लोकांमध्ये दिसत आहे. त्याच्यापुढे एक शीख तरुण उभा होता. नमस्कार करण्यासाठी खाली वाकल्यावर तो तरुण उठण्याची वाट पाहत शांतपणे उभा राहिला. त्यानंतर शीख तरुण उभा राहिला आणि बाहेर जाणाऱ्या दिशेनं जात असताना तेव्हा हा तरुण पुढे आला आणि तिथे बसवलेल्या ग्रीलजवळ पोहोचला. काही क्षण थांबल्यानंतर अचानक त्याने ग्रीलवरून उडी मारून आत उडी घेतली. त्यानं श्री गुरु ग्रंथसाहिब समोर ठेवलेली कृपाण उचलली. हा सर्व प्रकार अवघ्या काही सेकंदात घडला.

4 स्वयंसेवकांनी तरुणाला पकडलं

घटनेच्या वेळी SGPC चे अनेक कर्मचारी आणि विद्यार्थी तेथे उपस्थित होते. तरुणानं कृपाण उचलताच 4 स्वयंसेवकांनी त्याला पकडले. तरुणांनी विरोध केला, मात्र चार स्वयंसेवकांनी त्याला पकडून ग्रीलच्या बाहेर आणलं. तिथे उभ्या असलेल्या एका तरुणानं आणि एसजीपीसीच्या दुसर्‍या सेवेकरांनी त्याच्या डोक्याला पकडून बाहेर ओढले. यादरम्यान स्वयंसेवकांनी तरुणाला धक्काबुक्कीही केली.

पठण सुरू असताना गुरु ग्रंथसाहिबजवळ पोहोचला हा तरुण

शनिवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास सुवर्ण मंदिरातील सचखंड साहिबमध्ये राहस (संध्याकाळी करावयाचे श्री गुरु ग्रंथ साहिबचे पठण) सुरू होते. सुरक्षेसाठी येथे ग्रील करण्यात आले आहे. फक्त वाचक गाभाऱ्यात राहतात. रांगेत असलेला तरुण त्याची वेळ आल्यावर पटकन सचखंड साहिबच्या आत पोहोचला.

मृत व्यक्तीचं वय 24-25 वर्षे

सुवर्ण मंदिरात पोहोचलेले अमृतसरचे डीसीपी परमिंदर सिंह भंडल यांनी सांगितले की, मृत तरुणाचे वय सुमारे 24-25 वर्षे असून सुवर्ण मंदिरात प्रवेश करताना त्याने डोक्याला पिवळा पट्टा बांधला होता. तलावाच्या आत बांधलेल्या सचखंड साहिबला जाण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या तरुणाचे वागणं सामान्य वाटत होतं.

हेही वाचा-  ...आणि या अनोख्या लग्नात नवरीमुलीनेच करू दिलं नाही 'कन्यादान'

 डीसीपीच्या म्हणण्यानुसार, सचखंडच्या आत पोहोचल्यानंतर जिथे सर्वजण नतमस्तक होतात. या तरुणाने अचानक लोखंडी जाळीवर उडी मारली आणि श्री गुरु ग्रंथसाहिब गाठला. समोर ठेवलेले श्रीसाहेब (साबर) उचलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्वयंसेवकांनी त्याला पकडले. त्या तरुणाला स्वयंसेवकांनी एवढी मारहाण केली की, त्याला मंदिरातून बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु

डीसीपी म्हणाले की, सुवर्ण मंदिर संकुलात बाहेरून आतपर्यंत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. हा तरुण एकटा होता की त्याच्यासोबत आणखी कोणी आहे, हे जाणून घेण्यासाठी पोलीस प्रत्येक कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहेत. फुटेजमध्ये त्याच्यासोबत आणखी कोणी दिसल्यास तोही सापडेल. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, पोलिस रविवारी तरुणाचे पोस्टमार्टम करणार आहेत. त्यानंतर पुढे जी काही कारवाई होईल, ती केली जाईल. आतापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

सुवर्ण मंदिरात आठवडाभरातील दुसरी घटना

15 डिसेंबर रोजी सुवर्ण मंदिरातील पवित्र तलावात एका तरुणाने गुटखा फेकून दिला होता. एसजीपीजीच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाला घटनास्थळी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या तरुणाने आपलं नाव रणबीर सिंह असं सांगितलं.

First published:

Tags: Punjab