बहरामपूर, 25 जून : बरामपूर भागातून एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. येथे दोन आरोपींविरोधात हत्येचा (Murder) गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघेही फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहीत नंदा हे बहरामपूर (Bahrampur) येथे पत्नीसोबत राहत होते. मोहीत व्यवसायाने डॉक्टर (Doctor) होते. शहरातील ब्रम्हचारी मंदिराजवळ त्यांचं क्लिनिक होते. दुसरीकडे ते आर्थिक गुंतवणूकही करीत होते. 24 जून रोजी सायंकाळी मोहीतच्या पत्नीने त्यांना फोन करून घरी केव्हापर्यंत येणार असल्याचं विचारलं. तेव्हा ते एका बूट शॉपकडे कर्जाचे हप्ते घेण्यासाठी आले होते. मात्र रात्री 9 वाजले तरी डॉक्टर घरी आले नाही, म्हणून महिलेने चिंता व्यक्त केली, त्यानंतर अर्ध्या तासाने तिने डॉक्टरांच्या मोबाइलवर फोन केला तेव्हा फोन बंद येत होता. त्यानंतर महिला पतीला शोधण्यासाठी एका नातेवाईकाला घेऊन क्लिनिकजवळ पोहोचली. तेव्हा पाहिलं तर क्लिनिक सुरू होतं, मात्र डॉक्टर तेथे नव्हते. तेव्हा लकी बूट हाऊसचे मालक लखविंद्र पाल आणि अमन रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसले. तिने त्यांना डॉक्टरांबाबत विचारलं तर ते काहीही उत्तर न देता बाईकवर बसून निघून गेले. पंजाब केसरीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा- VIDEO : मास्क नाही म्हणून बँक ऑफ बडोद्याच्या गार्डने ग्राहकावर झाडली गोळी त्यावेळी बुटांच्या दुकानाची वीज सुरू होती. आम्ही शटर उचललं तर धक्काच बसला. तेथे डॉक्टरांचा मृतदेह एका खोणीत घालून ठेवला होता. जमिनीवर रक्त पसरलं होतं. ते पाहताच महिलेला जबर धक्का बसला. पोलिसांना सूचना देताच ते घटनास्थळी हजर झाले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला असून लकी बूट हाऊसचे मालक लखविंद्र पाल आणि अमन यांचा शोध घेतला जात आहे. सध्या ते दोघेही फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.