लहानग्यांना वेश्या व्यवसायात जुंपलं जातंय; लॉकडाऊनमध्ये मुलांची तस्करी वाढल्याने कोर्टाने व्यक्त केली चिंता

लॉकडाऊनमध्ये लहान मुलांच्या तस्करीत मोठी वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर चिंता व्यक्त केली आहे

लॉकडाऊनमध्ये लहान मुलांच्या तस्करीत मोठी वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर चिंता व्यक्त केली आहे

  • Share this:
    नवी दिल्ली, 8 जून : कोरोनाव्हायरस संसर्गामुळे गेल्या 24 मार्चपासून लॉकडाऊन अंतर्गत मुलांची तस्करी वाढल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊन दरम्यान सुप्रीम कोर्टानेही लहान मुलांच्या तस्करीबद्दल चिंता व्यक्त केली असून दोन आठवड्यांत केंद्र सरकारने नोटीस जारी करुन उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एस.ए. बोबडे म्हणाले की, मुलांची तस्करी होत  आहे, कारण याचा बाजार आहे. मुलांना तस्करी करून कामावर जुंपले जाते. मुलींना वेश्या व्यवसायात टाकले जाते. त्वरित मोठा निर्णय घेण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयानं बाल हक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी, ‘बचपन बचाओ आंदोलन’ या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायमूर्ती बोबडे म्हणाले की, मुलांची तस्करी रोखण्यासाठी कंत्राटदारांवर अंकुश ठेवणे फार महत्वाचे झाले आहे. कंत्राटदार मुलांना स्वस्त किंमतीत कामावर ठेवतात. अशा परिस्थितीत सर्व  कंत्राटदारांची आता नोंदणी केली पाहिजे. अशा प्रकारे ते कोणाकडे काम करत आहेत यावर सरकार लक्ष ठेवू शकेल. न्यायमूर्ती बोबडे यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना यावर काम करण्यास सांगितले. कोर्टाने सरकार आणि याचिकाकर्त्याला असे सांगितले की. मुलांची तस्करी का केली जाते यावर थोडे संशोधन करावे आणि त्यांचे जबाब नोंदवावेत. तसेच या समस्येचे निराकरण काय आहे ते आम्हाला सांगा. गरज भासल्यास न्यायालय यावर तज्ज्ञ समिती गठीत करेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दोन आठवड्यांनंतर होईल. हे वाचा-भयंकर! मेडिकलला लागलेल्या आगीत डॉक्टरचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी धरणाजवळील ओव्हर ब्रिजची भिंत कोसळली, 2 जणांचा दबून मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद
    First published: