मराठी बातम्या /बातम्या /देश /

सलाम! 100 मुलींच्या शिक्षणासाठी ‘त्या’ दोघी करणार लडाखमधली अस्पर्शित शिखरं पादाक्रांत

सलाम! 100 मुलींच्या शिक्षणासाठी ‘त्या’ दोघी करणार लडाखमधली अस्पर्शित शिखरं पादाक्रांत

या दोन तरूणींच्या गिर्यारोहणामुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या 100 मुलींच्या आयुष्यात बदल होणार आहे.

या दोन तरूणींच्या गिर्यारोहणामुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या 100 मुलींच्या आयुष्यात बदल होणार आहे.

या दोन तरूणींच्या गिर्यारोहणामुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या 100 मुलींच्या आयुष्यात बदल होणार आहे.

    मुंबई, 10 ऑगस्ट : उंचच उंच शिखरं पादाक्रांत करणं हा अनेक गिर्यारोहकांचा छंद असतो. तेलंगणातील दोन तरुणींची तर ती पॅशन आहे; पण दरवेळेस केलं जाणारं गिर्यारोहण आणि यावेळेस या दोघी करत असलेल्या गिर्यारोहणामध्ये खूप फरक आहे. या वेळेस त्यांच्या गिर्यारोहणामागे  एक उद्दिष्ट आहे. या वेळेस त्या या शिखरांवर चढणार आहेत ते प्रोजेक्ट शक्तीसाठी. शिक्षणापासून वंचित असलेल्या 100 मुलींच्या आयुष्यात त्यांच्या या गिर्यारोहणामुळे फरक पडणार आहे. काव्या मान्यापू आणि पूर्णा मालवाथ अशी या दोन तरुणींची नावं आहेत. काव्या ही राष्ट्रपती पुरस्कार विजेती आहे. ती अमेरिकेत अंतराळ वैज्ञानिक म्हणून काम करते. तर पूर्णा ही एव्हरेस्ट वीरांगना (Everest summit) आणि द सेव्हन समिट्स चॅलेंज (Seven summit challenge) पूर्ण करणारी ती सर्वांत तरूण महिला आहे. या दोघींनी मिळून 100 मुलींच्या शिक्षणासाठी 1,00,000 डॉलर्स उभे करण्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवलं आहे. सोमवारी (8 ऑगस्ट 2022) या दोघीजणी हैदाराबादहून लडाखमधील लेहला जाण्यासाठी निघाल्या आहेत. पुढच्या 15 दिवसांत या दोघी तरुणी आतापर्यंत लेहमधील जवळपास 6200 मीटर उंचीवरची शिखरं पादांक्रात करणार आहेत. विशेष म्हणजे ही शिखरं  कुणीही पादाक्रांत न केलेली म्हणजेच अस्पर्शित (Virgin) आहेत. अशाप्रकारच्या गिर्यारोहण करण्याच्या त्यांच्या भविष्यातील काही मोहिमांपैकी ही एक मोहीम आहे, असं प्रसिद्ध गिर्यारोहक शेखर बाबू यांनी सांगितलं. शेखर बाबू यांनीच ही मोहीम आखली आहे. देशप्रेम दाखवण्यासाठी युवकाने थेट डोळ्यातच रंगवला तिरंगा! म्हणाला मी केलं पण.. काव्या आणि पूर्णा या दोघीही जणी मूळच्या तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील आहेत. 2019 मध्ये जेव्हा पूर्णा युथ एक्स्चेंज प्रोग्रॅमअंतर्गत (Youth Exchange Program) अमेरिकेला गेली तेव्हा या दोघी पहिल्यांदा भेटल्या. गिर्यारोहणाची दोघींनाही आवड आहे आणि याच समान आवडीमधून त्यांनी समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी निधी जमा करण्याचं ठरवलं. “प्रोजेक्ट शक्तीचा भाग म्हणून आम्ही गिर्यारोहणाचा पर्याय निवडला. याचं कारण म्हणजे एखाद्या महिलेसाठी हा करिअरचा एक अत्यंत अपारंपरिक प्रकार आहे. आणि मुलींनी मोठी स्वप्नं बघितली पाहिजेत आणि त्यांना जे करायचं आहे ते करण्याची इच्छा त्यांनी बाळगली पाहिजे, हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे,” अशी प्रतिक्रिया काव्याने IANS ला दिली. कसला हा योगायोग 24 वर्षीय मुलगा आणि 42 वर्षीय आई दोघेही एकाचवेळी स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण पूर्णा नुकतीच जूनमध्ये नॉर्थ अमेरिकेतील तिची गिर्यारोहण मोहीम पूर्ण करून परतली आहे. आता ती लडाखमधल्या या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. “या मोहिमेसाठी मी खूप उत्सुक आहे. आतापर्यंत मी फक्त माझा छंद म्हणून गिर्यारोहण करत होते; पण आता मात्र एका विशिष्ट उद्दिष्टासाठी हे करणार आहे,” असं पूर्णाने IANS ला सांगितलं. या मेहिमेत त्यांच्याबरोबर आणखीही काही तरुणी सहभागी होत आहेत. हिमाचल प्रदेशची दिव्या ठाकूर, केरळची रेन्सी थॉमस, व्हिडिओग्राफर अमिता नेगी आणि संपर्क अधिकारी किमी अशी ही टीम असणार आहे. या मोहिमेचं प्रशिक्षण आणि जाण्या-येण्याच्या खर्चासाठी ट्रान्स्केंड ॲडव्हेन्चर्सकडून मदत दिली जात आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गिर्यारोहण केलेल्या शिखरांना त्यांची नावं देण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं या दोघीजणी सादर करणार आहेत. आपल्या छंदाचा वापर एका अत्यंत चांगल्या ध्येयासाठी निघालेल्या या तरुणींच्या मोहिमेला सगळीकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
    First published:

    Tags: Ladakh

    पुढील बातम्या