प्रियांका गांधींचं वय आणि रॉबर्ट वाड्रांचा 50 वा वाढदिवस, या फोटोंची आहे चर्चा...

प्रियांका गांधींचं वय आणि रॉबर्ट वाड्रांचा 50 वा वाढदिवस, या फोटोंची आहे चर्चा...

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी त्यांच्या प्रचाराच्या शैलीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. राहुल गांधी मोठे की त्या मोठ्या याबद्दलही सगळ्यांना उत्सुकता आहे. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी नुकताच 50 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्यांनी शेअर केलेले हे काही फोटो.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मे : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत असलेल्या प्रियांका गांधींची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. प्रियांका गांधी किती वर्षांच्या आहेत, राहुल गांधी मोठे की त्या मोठ्या अशा चर्चा सोशल मीडियावरही रंगल्या आहेत. प्रियांका गांधी या 47 वर्षांच्या आहेत आणि या दोघा भावाबहिणींमध्ये प्रियांका गांधी लहान आहेत. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी नुकताच 50 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्यांनी ट्विटरवर हे फोटो शेअर केले होते. प्रियांका आणि रॉबर्ट वा़ड्रा यांनी उत्तर प्रदेशात आपल्या मुलांसह प्रचार केला होता.


प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी उत्तर प्रदेशमध्ये रोड शो करत प्रचार केला.


रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या कुटुंबाचे आणखीही काही फोटो शेअर केले. माझ्यासोबत माझे हे सगळे कुटंबीय असल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Loading...


या घटनेमुळे प्रियांका आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यात झाली जवळीक


 
प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या कुटुंबाचे हे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच गाजले. प्रियांका गांधी यांच्याप्रमाणेच त्यांची मुलंही राजकारणात येणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे.


रॉबर्ट वाड्रा हे आपली आई आणि सोनिया गांधी यांच्यासह


रॉबर्ट वाड्रा यांनी सोनिया गांधी आणि आपल्या आईसोबतचा फोटोही त्यांच्या टि्वटरवर शेअर केला आहे. 18 एप्रिलला त्यांनी आपला हा 50 वा वाढदिवस साजरा केला. प्रियांका गांधींच्या राजकारणात सक्रिय होण्याने त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बरीच चर्चा होते. त्यामुळेच रॉबर्ट वाड्रा यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर गाजतं आहे.


 


 


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...