नवी दिल्ली, 11 जून : भारतामध्ये जेव्हा परदेशी पाहुणे येतात, तेव्हा ते इथल्या खाद्यपदार्थांच्या प्रेमात पडतात. याचे अनेक उदाहारणं आतापर्यंत समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी (Hiroshi Suzuki) यांच्यासोबत देखील घडला आहे. एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओमध्ये जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी हे आपल्या पत्नीसोबत वडापाव खाताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल पुण्यातील रस्त्यांवर हिरोशी सुजुकी आणि त्यांच्या पत्नीने महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूडचा आनंद लुटला. याचदरम्यानचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हिरोशी सुजुकी यांनी स्वत: हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुजुकी आणि त्यांच्या पत्नी वडापाव खाताना दिसत आहेत, माझ्यासाठी तिखट कमी टाक अशी सूचना यावेळी वडापाव विक्रेत्याला सुजुकी यांनी दिली. मात्र त्याचवेळी त्यांची पत्नी मात्र मला थोड तिखट जास्त हवं आहे, असं विक्रेत्याला म्हणते. तेव्हा विक्रेता म्हणतो कोल्हापुरी? तेव्हा त्या डन असे म्हणतात, हा व्हिडीओ जपानच्या राजदुतांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर अपलोड केला आहे. आम्ही पुण्यामध्ये वडापावचा अस्वाद घेतला, मात्र वडापावच्या स्पर्धेमध्ये मी माझ्या पत्नीकडून हारलो असं कॅप्शन त्यांनी आपल्या या व्हिडीओला दिलं आहे.
My wife beat me!🌶#Pune #Kolhapuri pic.twitter.com/JsM1LxcRK5
— Hiroshi Suzuki, Ambassador of Japan (@HiroSuzukiAmbJP) June 10, 2023
मोदींची प्रतिक्रिया हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, ‘ही एक अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये तुम्हाला हारल्याचं कधीच वाईट वाटणार नाही मिस्टर राजदूत. तुम्ही भारताच्या पाककलेचा मनापासून अस्वाद घेत आहात हे पाहून आनंद झाला’ अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर मोदींनी दिली आहे. हा 22 सेकंदाचा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास आठ लाख जणांनी शेअर केला आहे.