भारतात 59 चिनी अॅप्सवरील बंदीनंतर पहिल्यांदा चीनने दिली प्रतिक्रिया

भारतात 59 चिनी अॅप्सवरील बंदीनंतर पहिल्यांदा चीनने दिली प्रतिक्रिया

भारतातील 59 चिनी अॅप्सवर बंदी आणल्यामुळे चीनला मोठा फटका बसला आहे

  • Share this:

बीजिंग, 30 जून : भारत सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनची पहिली अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. चीनने मंगळवारी सांगितले की, ते या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आणि त्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची माहिती गोळा करीत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. या आधी चिनी माध्यमांनी भारतावर निशाणा साधत म्हटले होते की, चिनी मालावर बंदी घालण्यासाठी अमेरिकेने अवलंबिलेल्या धोरणानुसार भारत अनुसरण करीत आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान म्हणाले की, चीन या प्रकरणामुळे चिंतेत आहे आणि संपूर्ण प्रकरणा संबंधित माहिती गोळा करीत आहे. झाओ पुढे म्हणाले की, चीन नेहमीच आपल्या कंपन्यांनी इतर देशांच्या कायद्यांचे पूर्णपणे पालन करावे अशी अपेक्षा करतो आणि त्यासंदर्भात सूचना देखील देतो. तसेच चिनी गुंतवणुकदारांसह परदेशी गुंतवणुकदारांच्या कायदेशीर हक्कांचा आदर करण्याची जबाबदारी भारताची आहे.

चिनी माध्यमं म्हणाले अमेरिकेची केली नक्कल

दुसरीकडे, चिनी माध्यमांनी भारताच्या या कारवाईला अमेरिकेची नक्कल करणे म्हटले आहे. चीनच्या अधिकृत वृत्तपत्राने म्हटले आहे की, भारत अमेरिकेप्रमाणेच चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची सबब शोधत आहे. या चिनी अॅप्लिकेशन्सचे सर्व्हर भारताबाहेर अस्तित्त्वात आहेत आणि त्यांच्यामार्फत वापरकर्त्यांचा डेटा चोरीला जात असल्याचे भारताचे म्हणणे आहे.

हे वाचा-Chinese Apps Ban: TikTok सह 59 अॅप्सवर भारतात बंदी आहे पण ब्लॉक नाही

टिकटॉक म्हणाले, भारताशी बोलू

टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी निवेदनात म्हटले आहे की, स्पष्टीकरण आणि उत्तरासाठी आम्ही संबंधित सरकारी भागधारकांना भेटण्याचे आवाहन केले आहे. देशभरात सरकारने बंदी घातलेल्या चिनी अॅप्सपैकी टिकटॉक, यूसी ब्राउझर, वेचॅट, शेअरइट आणि कॅम स्कॅनर हे आहेत. निखिल गांधी म्हणाले, 'सरकारने टिकटॉकसह इतर अ‍ॅप्सवर अंतरिम बंदी घातली आहे. या बंदीसाठी आम्ही लवकरच सरकारशी बोलणार आहोत.

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 30, 2020, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading