मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक; तब्बल 15 ते 20 मिनिटं फ्लायओव्हरवर अडवणूक

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक; तब्बल 15 ते 20 मिनिटं फ्लायओव्हरवर अडवणूक

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे या रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे या रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे या रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

चंदीगड, 5 जानेवारी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब भागात (Prime Minister Modi's Punjab rally) रॅली घेणार होते. मात्र त्यांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे या रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज फिरोजपूर येथे मोदींच्या रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सुरक्षेत चूक घडल्यामुळे ते फिरोजपूरमधील रॅलीला जाऊ शकले नाही. काही आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला अडवलं. त्यामुळे 15 ते 20 मिनिटांपर्यंत हा ताफा फ्लायओव्हरवर अडकला होता.

यानंतर अनेकांकडून टीका केली जात आहे. पंजाब सरकारला आधीच मोदींच्या कार्यक्रमाची माहिती होती. त्यामुळे त्यांनी प्लान बी तयार ठेवणं अपेक्षित होतं, असं सांगितलं जात आहे. याशिवाय रस्ते मार्गावर पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती. ही गंभीर चूक असल्याचं मानलं जात आहे. या प्रकरणात गृह मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली असून पंजाब सरकारकडून सविस्तर रिपोर्ट मागवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी पंजाबमधील हसैनीवाला येथून दिल्लीसाठी रवाना झाली.

हे ही वाचा-VIDEO - ढोल पाहताच PM मोदीही स्वतःला रोखू शकले नाही; दाखवलं आपलं जबरदस्त टॅलेंट

फिरोजपूर व्यतिरिक्त 9 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींची उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे रॅली होणार होती. ही रॅलीदेखील रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती सांगितली जात आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाचं वक्तव्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेचा भंग करण्यात आला. आज सकाळी पंतप्रधान भटिंडा येथे उतरले तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते. पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे, पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे 20 मिनिटे वाट पाहिली. जेव्हा हवामान सुधारले नाही, तेव्हा असे ठरले की तो रस्त्याने राष्ट्रीय मेरीटर्स मेमोरियलला भेट देईल, ज्यासाठी 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागेल. डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यास निघाले.

हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर, जेव्हा पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवला असल्याचे दिसून आले. पंतप्रधान 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती. पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांना रसद, सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करावी लागेल तसेच आकस्मिक योजना तयार ठेवावी लागेल. तसेच आकस्मिक योजना लक्षात घेता पंजाब सरकारला रस्त्याने कोणतीही हालचाल सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी लागेल, जी स्पष्टपणे तैनात केलेली नव्हती. या सुरक्षेतील त्रुटींनंतर पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. राज्य सरकारलाही या चुकांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

First published:

Tags: Modi government, PM Naredra Modi, Punjab