मणिपूर, 04 जानेवारी : ढोल हे असं वाद्य आहे, जे वाजताच अनेकांच्या जणू अंगातच येतं. नाचता येत असेल किंवा नसेल तरी ढोल वाजू लागला, त्याचा आवाज कानावर पडला की शरीर आपोआप थिरकू लागतं. त्यांना ढोल वाजवायला आवडतं, त्यांचे तर हातही हलू लागतात. याच ढोलचा मोह पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra modi) आवरू शकले नाहीत. समोर ढोल दिसताच मोदींनीही आपल्यातील टॅलेंट दाखवलं आहे (Pm narendra modi plays dhol video). पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेहमी काही ना काही तरी नवं करण्याकडे कल असतो. त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यात त्यांचं हटके रूप पाहायला मिळालं आहे. पंतप्रधान मोदी चक्क ढोल वाजवताना दिसले. मणिपूरमधील त्यांचा हा व्हिडीओ आहे (Pm narendra modi in Manipur).
#WATCH | Prime Minister Narendra Modi plays traditional musical instruments during his visit to Manipur pic.twitter.com/2Y4X11wV9z
— ANI (@ANI) January 4, 2022
मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर होते. 13 वेगवेगळ्या योजनांचं त्यांनी आज उद्घाटन केलं. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी मणिपूरवासियांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनांचं उद्घाटनावेळी त्यांनी मणिपुरी भाषेत भाषण सुरू केलं. हे वाचा - Sindhutai Sapkal passed away : हजारो अनाथ लेकरांची आई हरपली, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं निधन त्याचवेळी तिथं पारंपारिक वाद्यही वाजवली जात होती. ही पारंपारिक वाद्य पाहून मोदीही स्वतःला रोखू शकले नाहीत. या वाद्यांची ओळख करून घेतली. ती कशी वाजवली जातात हे त्यांनी नीट पाहिलं. त्यानंतर स्वतःही ते वाद्य वाजवलं. मोदी चक्क ढोल वाजवताना दिसले. त्यांनी जबरदस्त ढोल वाजवला आहे.