मराठी बातम्या /बातम्या /देश /राष्ट्रपतींच्या दौऱ्यानं घेतला दोघांचा बळी; CRPFच्या ताफ्यानं 3 वर्षाच्या चिमुकलीला चिरडलं अन्...

राष्ट्रपतींच्या दौऱ्यानं घेतला दोघांचा बळी; CRPFच्या ताफ्यानं 3 वर्षाच्या चिमुकलीला चिरडलं अन्...

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) सध्या कानपूर दौऱ्यावर (Kanpur Visit) आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्या या दौऱ्यानं दोन जणांचा बळी (2 Died) घेतला आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) सध्या कानपूर दौऱ्यावर (Kanpur Visit) आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्या या दौऱ्यानं दोन जणांचा बळी (2 Died) घेतला आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) सध्या कानपूर दौऱ्यावर (Kanpur Visit) आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्या या दौऱ्यानं दोन जणांचा बळी (2 Died) घेतला आहे.

कानपूर, 26 जून: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) सध्या कानपूर दौऱ्यावर (Kanpur Visit) आहेत. राष्ट्रपती कोविंद यांचा हा दौरा दोन जणांच्या जीवावर (2 Died) बेतला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात असणाऱ्या CRPF जवानांच्या ताफ्यानं 25 जून रोजी एक 3 वर्षाच्या चिमुकलीला चिरडलं (CRPFs convoy crushed 3 year old girl) आहे. तर दुसऱ्या एका घटनेत व्हीव्हीआयपी मुव्हमेंट सुरू असल्यानं ट्रफिकमध्ये अडकलेल्या एका पोस्ट कोविड महिला रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू (Death in traffic Jam) झाला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ड्युटीवर असणाऱ्या पोलीस आयुक्तांनी संबंधित महिलेच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीनं देखील पीडित कुटुंबीयांची माफी मागितली आहे.

शुक्रवारी सकाळी राष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असणा CRPF जवानाच्या एका वेगवान वाहनानं तीन वर्षाच्या चिमुकलीला चिरडलं आहे. खरंतर, या वाहनानं एका दुचाकी स्वारला जोरदार धडक मारली होती. घटनेत ही संबंधित मुलगी दुचाकीवरून खाली पडली आणि वाहनाच्या चाकाखाली आली. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत, 25 जून रोजी सायंकाळी राष्ट्रपतींच्या विशेष गाड्यांसाठी गोविंदनगर याठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर वाहतूक रोखून धरण्यात आली होती. या दरम्यान वंदना नावाच्या 50 वर्षीय महिला खासगी गाडीनं रुग्णालयात जात होत्या. पण राष्ट्रपतींच्या ताफ्याला वाट मोकळी करून दिल्यानं, अत्यवस्थ असणाऱ्या वंदना ट्रॅफिकमध्ये अडकल्या. साधारणतः एक तासभर ही वाहतूक कोंडी करण्यात आली होती. यानंतर येथील वाहतूक सुरळीत व्हायला आणखी अर्धा तास लागला. यामुळे 50 वर्षीय वंदना रूग्णालयात वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. वेळेत उपचार न मिळाल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-दिल्लीत जाताच नाना पटोले गार, स्वबळाचा नारा निघाला फुसका बार

ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलीस आयुक्तानी पीडित महिलेच्या परिवाराची माफी मागून दुःख व्यक्त केलं आहे. तर राष्ट्रपती कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, याची खबरदारी घेण्याचा सल्लाही राष्ट्रपतीच्या पत्नीनं आयुक्तांना दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Kanpur, President ramnath kovind