नवी दिल्ली, 26 मार्च: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची प्रकृती शुक्रवारी सकाळी खालावल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना आर्मी रुग्णालयात (Army Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
'छातीत दुखत असल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांचे रुटीन चेकअप सुरु आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर आहे', असं आर्मी रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
बांगलदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना ही बातमी कळताच त्यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या मुलाशी संपर्क साधला आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
PM @narendramodi spoke to Rashtrapati Ji's son. He enquired about the President's health and prayed for his well-being.
— PMO India (@PMOIndia) March 26, 2021
काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्नीसह रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, PM narendra modi, President ramnath kovind, Wellness