मराठी बातम्या /बातम्या /देश /

426 जणांचे प्राण वाचवणारा हिरो, ‘या’ कर्मचाऱ्यामुळेच टळली दोन विमानांची जीवघेणी टक्कर

426 जणांचे प्राण वाचवणारा हिरो, ‘या’ कर्मचाऱ्यामुळेच टळली दोन विमानांची जीवघेणी टक्कर

एकाच वेळी हवेत उड्डाण केलेल्या दोन विमानांची टक्कर झाली असती, तर दोन्ही विमानांतील मिळून 426 जणांचा जीव धोक्यात आला असता. मात्र एका कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे हे संकट टळलं.

  • Published by:  desk news

बंगळुरू, 20 जानेवारी: एकाच वेळी बंगळुरू विमानतळावरून (Bengaluru Airport) इंडिगो कंपनीच्या दोन विमानांनी (2 Indigo flights) उड्डाण केल्यामुळे होणारी संभाव्य टक्कर (Crash) अगदी थोडक्यात टळली. ही टक्कर टळण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली रडार कंट्रोलर (Radar Controller) या पदावर काम करणाऱ्या लोकेंद्र सिंह (Lokendra Singh) या तत्पर कर्मचाऱ्याने. बंगळुरू विमानतळावर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही दिशांना धावपट्ट्या आहेत. मात्र दोन्हींच्या समन्वयात झालेल्या गोंधळामुळे एकाच वेळी दोन विमानं हवेत झेपावली होती. मात्र ही टक्कर टळली ती रडार कंट्रोलर लोकेंद्र सिंह यांच्यामुळे.

पायलटना दिली सूचना

बंगळुरू विमानतळावर रडार कंट्रोलर म्हणून काम करणाऱ्या 42 वर्षांच्या लोकेंद्र सिंह यांनी विमानाला डायव्हर्जिंग हेडिंग दिलं. त्यामुळे दोन्ही विमानांचे वैमानिक अलर्ट झाले आणि दोघंही आपापली विमानं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला घेऊन जाऊ शकले. एका क्षणी ही विमानं एकमेकांच्या इतकी जवळ आली होती, की कुठल्याही क्षणी त्यांची एकमेकांशी टक्कर होऊ शकली असती. मात्र लोकेंद्र सिंह यांच्या प्रसंगावधानामुळेच हा अपघात टळला. 

लोकेंद्र यांनी वाचवले 426 जणांचे प्राण

या दोन विमानांमध्ये टक्कर झाली असती तर अत्यंत भीषण अपघात झाला असता. दोन्ही विमानं तब्बल 3 हजार फूट उंचीवर होती. प्रचंड वेगाने एकाच दिशेने झेपावलेल्या या विमानांचा एकमेकांना स्पर्श जरी झाला असता तरी मोठा अपघात होऊन दोन्ही विमानं खाली कोसळली असती. या दोन्ही विमानांत मिळून 426 प्रवासी होते. या सर्वांचा जीव धोक्यात आला असता. मात्र लोकेंद्र सिंह यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळेच या सर्वांचा जीव वाचू शकला. 

हे वाचा -

अशी झाली होती चूक

7 जानेवारी या दिवशी उत्तरेची धावपट्टी ही टेकऑफसाठी आणि दक्षिणेची धावपट्टी लँडिंगसाठी वापरण्याचा निर्णय सकाळी घेण्यात आला होता. त्यानंतर दक्षिणेची धावपट्टी बंद करण्याचा निर्णय ड्युटीवर असणाऱ्या इन-चार्जने घेतला. मात्र या गोष्टीची कल्पना दक्षिणेच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला देण्यात आली नव्हती. त्यामुळे एअऱ ट्रॅफिक कंट्रोलकडून एकाच वेळी दोन्ही धावपट्टीवरील विमानांना उड्डाणाची परवानगी देण्यात आली होती. या घटनेची सध्या DGPR कडून चौकशी सुरू आहे. 

First published:

Tags: Airport, Bengaluru, Crash, Worker