इंदुर, 29 मार्च: एका 21 वर्षीय तरुणाने दारू पिऊन रस्त्यावर तुफान राडा केला आहे. आरोपी तरुणाने दारुच्या नशेत असताना हातात चाकू घेऊन घरातून बाहेर पडला (drunken young man went out with knife) आणि त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर जीवघेणे हल्ले (Attack on many people) केले आहेत. त्याच्या भयानक कृत्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. पोलिसांनी या आरोपी तरुणाला अटक (Accused arrest) केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
सध्या देशात कोरोनामुळे जागोजागी कडक निर्बंध लादले आहेत. बोटावर मोजण्याइतके लोकं रस्त्यावर निघत आहेत. अशा परिस्थितीत संबंधित आरोपी तरुणाने दारूच्या नशेत रस्त्यावर दिसणाऱ्या एकट्या नागरिकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. संबंधित घटना मध्यप्रदेशातील इंदुर येथील आहे. इंदुर शहरातील बाणगंगा परिसरात आरोपी तरूणाने रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तीन गंभीर गुन्हे केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित 21 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव रोहन विशाल वानखेडे असून तो नंदनगर येथे राहतो. आरोपी रोहन सकाळी 6 वाजता एक चाकू घेऊन घराबाहेर पडला होता. त्याने सर्वप्रथम भगीरथपुरा याठिकाणी इंदर नावाच्या युवकावर अचानक हल्ला केला. यावेळी आरोपीने पीडित तरुणाच्या पोटात चाकू खूपसला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर आरोपी तरुणाने अरुणा वर्मा नावाच्या एका महिल्याच्या कानावर चाकूने वार केला. मद्यधुंद आरोपी तरुण एवढ्यावरचं थांबला नाही. तर त्याने कचरा वेचणाऱ्या गाडी चालकाला चाकूच्या धाकाने सेंगर चौकापर्यंत आणलं आणि याठिकाणी चालकाकडून मोबाइल आणि पैशाचं पाकीट लुटलं आहे.
हे ही वाचा - संतापजनक! नशेद धुंद होती आई, दीड महिन्याच्या चिमुकलीचा भुकेनं मृत्यू
आरोपीने तीन गुन्हे केल्यानंतर तो हीरा नगर पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होता. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी हातात चाकू पाहून आरोपी तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीची चौकशी केली असता, त्याने केलेल्या गुन्ह्यांची मालिकाच समोर आली आहे. पोलीस सध्या आरोपी तरुणाची चौकशी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack, Crime news, Madhya pradesh, Theft