मराठी बातम्या /बातम्या /देश /West Bengal Assembly Election : तृणमूलच्या विजयासाठी प्रशांत किशोर यांची काय आहे खेळी

West Bengal Assembly Election : तृणमूलच्या विजयासाठी प्रशांत किशोर यांची काय आहे खेळी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections 2021) पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.या निवडणूकीत भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी निवडणूकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर (Prasanth Kishore)  महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 10 फेब्रुवारी :  दोन महिन्यांनी म्हणजे एप्रिल 2021 मध्ये होणाऱ्या  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections 2021) पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि तृणमूल काँग्रेस(TMC) या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत होणार असून, ती अत्यंत चुरशीची होणार असल्यानं या निवडणुकीकडं सर्वांच लक्ष लागलं आहे. या निवडणूकीत भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी निवडणूकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर (Prasanth Kishore)  महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळं पक्षाला पडलेलं खिंडार ओळखून, त्यातील त्रुटी कमी करणं आणि दूर गेलेल्या पक्षाच्या मतदारांना पुन्हा पक्षाकडं वळवण्यासाठी प्रशांत किशोर यांची इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमिटी (Indian Political Action Committee- IPAC) काम करत आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी उमेदवार निवडीवरही प्रशांत किशोर यांची टीम लक्ष केंद्रित करत आहे. भाजप अतिशय वेगानं मतदारांमध्ये आपलं स्थान बळकट करत आहे.

आदिवासी, अनुसूचित जाती जमातींमध्ये त्यांचा प्रभाव वाढत आहे. 2019 मध्ये राज्यातील पश्चिम आणि उत्तर भागातील आदिवासी, अनुसूचित जाती जमातींची मतं भाजपला मिळाली होती, त्यामुळं भाजपला 18 जागांवर विजय मिळाला होता. हे लक्षात घेऊन तृणमूल काँग्रेस पक्ष या मतदारांपर्यंत पोहोचेल, यावर प्रशांत किशोर यांनी भर दिला आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असून, त्याकरता जिल्हा स्तरावरील आणि वरिष्ठ स्तरावरील कार्यकर्ते थेट तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  यांच्याशी चर्चा करू शकतात.

अशाच एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, भाजपनं लोकसभा निवडणूकीत तुमच्या आधारावर अनेक जागा जिंकल्या आहेत. जंगल महाल आणि उत्तर बंगाल मध्ये त्यांनी विजय मिळवला;पण त्यांनी तुम्हाला काय दिलं? त्यांच्या सरकारच्या योजनेद्वारे आतापर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या 10 लाख लोकांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात आलं आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यातून त्यांनी योग्य तो संदेश मतदारांना दिला.

अशाप्रकारे प्रशांत किशोर यांची इंडियन पॉलिटीकल अक्शन कमिटी (IPC) अनुसूचित जाती जमातींच्या नेत्यांबरोबर काम करून या वर्गाची मतं पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या खात्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरेल असा तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास आहे.

First published:

Tags: Trinamool congress, West bengal, West Bengal bjp