मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्वतःच्या शरीराचा तिरस्कार ते हैदराबादेत पहिला पोल डान्स स्टुडिओ उभारण्यापर्यंतचा प्रवास, पौंड कक्करची प्रेरणादायी कहाणी

स्वतःच्या शरीराचा तिरस्कार ते हैदराबादेत पहिला पोल डान्स स्टुडिओ उभारण्यापर्यंतचा प्रवास, पौंड कक्करची प्रेरणादायी कहाणी

पौंडचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. स्वतःच्या शरीराबद्दल असणाऱ्या तिरस्काराच्या भावनेनं तिच्या आयुष्यातील अनेक वर्षं त्रासात गेली. पण वेळीच तिने यातून बाहेर पडत पोल डान्सच्या (Pole Dance) माध्यमातून स्वतःचं स्थान निर्माण केलं

पौंडचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. स्वतःच्या शरीराबद्दल असणाऱ्या तिरस्काराच्या भावनेनं तिच्या आयुष्यातील अनेक वर्षं त्रासात गेली. पण वेळीच तिने यातून बाहेर पडत पोल डान्सच्या (Pole Dance) माध्यमातून स्वतःचं स्थान निर्माण केलं

पौंडचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. स्वतःच्या शरीराबद्दल असणाऱ्या तिरस्काराच्या भावनेनं तिच्या आयुष्यातील अनेक वर्षं त्रासात गेली. पण वेळीच तिने यातून बाहेर पडत पोल डान्सच्या (Pole Dance) माध्यमातून स्वतःचं स्थान निर्माण केलं

नवी दिल्ली 15 एप्रिल : काहींना आपल्या रंगाचा, काहींना शरीराच्या (Body) आकाराचा न्यूनगंड असतो. न्यूनगंड असला की त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास (Confidence) कमी होऊ लागतो. मनातल्या नकारात्मक भावनांवर वेळीच मात केली नाही तर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. अशा न्यूनगंडातून बाहेर पडून मोठं नाव कमावलेल्या बऱ्याच व्यक्ती आहेत. तुम्हीही असे अनेकजण पाहिले असतील. अशा एका तरुणीची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. या तरुणीचं नाव आहे पौंड कक्कर (Pound Kakar).

स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करण्यापासून ते स्वतःवर आत्मविश्वास वाटण्यापर्यंत, पौंड कक्करने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. अगदी कमी वयात मुंबई सोडून हैदराबादपर्यंतचा प्रवास करणारी पौंड आता हैदराबादमध्ये पोल डान्सिंग स्टुडिओ चालवते. हा हैदराबादमधला पहिला व्यावसायिक पोल डान्सिंग स्टुडिओ (Pole Dancing Studio) आहे. एकेकाळी निगेटिव्ह गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी तिने निवडलेला पोल डान्स हेच तिचं करिअर बनलंय. या संदर्भात तेलंगण टुडेनं वृत्त दिलंय.

एकमेकींवर जिवापाड प्रेम करणाऱ्या मैत्रिणींनी उभा केला संसार; मात्र कोर्टाने दिला नकार

तरुण वयात मुंबईहून हैदराबादला (Mumbai To Hyderabad) जाणं पौंडसाठी सोपं नव्हतं. त्यात तिला लहानपणी शाळेत तिच्या रंगावरून आणि शरीरयष्टीवरून प्रचंड त्रास सहन करावा लागला. तिच्या सोबतची मुलं-मुली तिची खिल्ली उडवायची, बाहेरही तिला लोकांचे टोमणे सहन करावे लागले. शरीरयष्टी खूपच सडपातळ (Skinny) असल्यानं तिने जर डान्स किंवा इतर शारीरिक हालचाली केल्या, तर ती अजून बारीक होईल, या भीतीने तिला 10 वर्षे शारीरिक हालचालींपासून दूर ठेवण्यात आलं.

2018 मध्ये वैयक्तिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी पौंडने पोल डान्सला सुरुवात केली. "मला खरंच माहीत नाही. मला वाटलं की तोच (पोल डान्स) माझ्याकडे चालून आला आहे. मी माझ्या शरीराचा खूप काळ तिरस्कार केला. पण जेव्हा मी पोलवर चढून चॉपर चालवू लागले, तेव्हा मला कळलं की माझं शरीर माझ्यासाठी खूप काही करू शकतं,” असा अनुभव पौंडने सांगितला.

पौंडचे पालक डॉक्टर असून तिला जुळी बहीण (Twins) आहे. घरातलं वातावरण मोकळं आहे. त्यामुळे या क्षेत्रात येण्यासाठी तिला घरातून अडचण आली नाही. जेव्हा तिने पोल डान्सिंगसाठी क्लासमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हैदराबादमध्ये एकही डान्स स्टुडिओ नव्हता. मग तिने मुंबईत एका क्लासमध्ये प्रवेश घेतला. परंतु दोनच दिवस गेल्यानंतर ती परत आली आणि इंटरनेटवरून (Internet) स्वतःहून डान्स शिकली. ती दिवसभर काम करायची आणि संध्याकाळी प्रॅक्टिस (Practice) करायची. त्याचवेळी हैदराबादमध्ये पोल डान्सची सुरुवात करायचा निर्णय तिने घेतला आणि या वर्षी तिनं स्वतःचा पोल डान्सचा स्टुडिओ सुरू करत हे स्वप्न पूर्ण केलं. या जानेवारी महिन्यात तिने ‘Pole Fit, Bold Fit’ नावाने कोंडापूरमध्ये स्टुडिओ सुरू केला आहे.

टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म, कमोडमध्येच डोक अडकलं; आईने मात्र....

पौंडच्या स्टुडिओत पोल डान्स शिकण्यासाठी आवश्यक असलेली सर्व व्यावसायिक उपकरणं आहेत. शिवाय म्युझिक आणि लाईट्सदेखील उत्तम आहेत. ती दर आठवड्याला सहा क्लास घेते आणि पोल डान्स शिकण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी वेगवेगळे दोन मंथली पॅकेजेस ऑफर करते. तिच्या स्टुडिओत वय आणि लिंग (Age And Gender) यांचं बंधन नाही. “ज्याला आवड असेल तो पोल डान्स शिकू शकतो. यासाठी तुमची शरीरयष्टी कशी आहे ते महत्वाचं नाही. ही कला शिकण्यासाठी सर्व प्रकारची शरीरयष्टी उत्तम आहे,”असं पौंड सांगते.

पौंड म्हणाली, ‘अनेकांना वाटतं की पोल डान्स हा परदेशांतील क्लबमध्ये (Dance Club) सादर केला जाणारा एक एरॉटिक डान्स प्रकार (Erotic Dance Style) आहे. पण तसं नाही. आधी माझा डान्स हा मर्यादित होता. पण लॉकडाऊनमध्ये (Lockdown) इन्स्टाग्रामवरील माझा एक रील व्हायरल झाला. त्यावर अनेक कॉमेंट्स आल्या. ज्या अतिशय सेक्सी स्वरूपाच्या होत्या. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पोल डान्स हा एक कला (Art) प्रकार म्हणून समजला पाहिजे. यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीरावर प्रेम (Love) करायला लावण्याची क्षमता आहे.”

पौंडचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. स्वतःच्या शरीराबद्दल असणाऱ्या तिरस्काराच्या भावनेनं तिच्या आयुष्यातील अनेक वर्षं त्रासात गेली. पण वेळीच तिने यातून बाहेर पडत पोल डान्सच्या (Pole Dance) माध्यमातून स्वतःचं स्थान निर्माण करत वेगळी ओळख मिळवली. आज हैदराबादेत (Hyderabad) तिचा स्वतःचा स्टुडिओ आहे. ज्या माध्यमातून ती तिची डान्सची आवड तर पूर्ण करतेच, शिवाय चांगलं कमवतदेखील आहे. त्यामुळे आपल्या आवडीचं काम करून माणूस नक्कीच सर्व नकारात्मक गोष्टी (Negative Thinking) आणि विचारांवर मात करू शकतो, हे पौंड कक्करने दाखवून दिलंय.

First published:

Tags: Career, Dancer