Home /News /maharashtra /

BREAKING : पुण्यात एका रात्रीत कोरोनाचे 55 नवे रुग्ण, वॉर्डनिहाय अशी आहे संख्या

BREAKING : पुण्यात एका रात्रीत कोरोनाचे 55 नवे रुग्ण, वॉर्डनिहाय अशी आहे संख्या

सोसासयट्यांमधून झोपडपट्ट्यांपर्यंत पसरलेला या व्हायरसने आतापर्यंत जिल्ह्यात 77 जणांचा बळी घेतला आहे.

पुणे, 27 एप्रिल : पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. पुण्यात काल रात्रीपासून तब्बल 55 रुग्णांचा वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा आता 1319 वर पोहोचला आहे. सोसासयट्यांमधून झोपडपट्ट्यांपर्यंत पसरलेला या व्हायरसने आतापर्यंत जिल्ह्यात 77 जणांचा बळी घेतला आहे. पुण्याताील रूग्णांची वार्डनिहाय संख्या (रविवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार) भवानी पेठ 245 ढोलेरोड 163 शिवाजीनगर घोलेरोड 142 कसबापेठ, विश्रामबागवाडा 131 येरवडा, कळस, धानोरी 127 धनकवडी 61 वानवडी, रामटेकडी 56 हडपसर, मुंढवा 32 बिबवेवाडी 32 नगररोड 30 कोंढवा, येवलेवाडी 16 सिंहगडरोड 10 वारजे, कर्वेनगर 9 औंध, बाणेर 4 कोथरूड, बावधन 2 भवानी पेठ, कासेवाडी, ताडीवाला रोड, पाटील इस्टेट या भागातच का वाढतोय संसर्ग? सर्वाधिक रूग्णसंख्या असलेली पुणे शहरातील ही प्रमुख ठिकाणं एकतर दाटलोकवस्ती किंवा झोपडपट्टीचा भाग आहेत. केवळ सीलबंद लॉकडाऊन करून तिथं सोशल डिस्टंट पाळणं केवळ अशक्य प्राय गोष्ट आहे. म्हणूनच आतातरी जिल्हा साथरोग आपत्ती व्यवस्थापन आणि पालिका प्रशासनानं या कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या झोपडपट्टी भागातील लोकांना मोकळ्या शाळा, हॉल्स, मैदानांमध्ये हलवण्याची सूचना पुणे पोलिसांनी केल्याचं कळतंय. कारण दाटवस्ती भागातील लोकांना लॉकडाऊन करून ठेवल्यानं फैलाव कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालला आहे. कारण याभागात लोकांना कॉमन टॉयलेट- बाथरूम वापरावी लागतात. अरूंद गल्ल्या, बैठी पऱ्याची घरं...अशातच 10 बाय 10 च्या खोल्यांमधून किमान पाच-सहा माणसं राहत असल्याने घरातील एकाला संसर्ग झाला की तो किमान सहा ते सात जणांना संसर्गित करत असल्याचं आढळून आलं आहे. म्हणूनच पालिकेने या भागातील लोकांचं आरोग्य सर्वेक्षण करून त्यांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. पण लक्षणं न दाखवणाऱ्या कोरोना बाधितांचं काय हा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे. कारण बाधितांनी लक्षणं दाखवल्याशिवाय त्याची कोरोना चाचणीच होत नाही तोपर्यंत तो वाहक बनून आणखी लोकांना संसर्गित करत असल्याचं आढळून आलं आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या