मराठी बातम्या /बातम्या /देश /पूनम पांडेचा नवा वादग्रस्त पॉर्न व्हिडिओ गोव्यात व्हायरल, सरकारची डोकेदुखी वाढली

पूनम पांडेचा नवा वादग्रस्त पॉर्न व्हिडिओ गोव्यात व्हायरल, सरकारची डोकेदुखी वाढली

पूनम पांडेच्या बॉयफ्रेंडने दोघांचा फोटो शेअर करत, अखेर आम्ही करून दाखवलं असे कॅप्शन दिले आहे. (Photo Credit: Instagram/@ipoonampandey)

पूनम पांडेच्या बॉयफ्रेंडने दोघांचा फोटो शेअर करत, अखेर आम्ही करून दाखवलं असे कॅप्शन दिले आहे. (Photo Credit: Instagram/@ipoonampandey)

पूनम पांडेचा पॉर्न प्रकारात मोडणारा व्हिडिओ गोव्यात वायरल झाला आहे.

अनिल पाटील, गोवा, 3 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये सातत्याने वादग्रस्त घडामोडींसाठी प्रसिद्ध असलेल्या पूनम पांडेचा पॉर्न प्रकारात मोडणारा व्हिडिओ गोव्यात वायरल झाला आहे. हा व्हिडीओ गोवा सरकारच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर शूट करण्यात आला असल्याने याला विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत सरकारला धारेवर धरले आहे.

सध्याच्या कोविडच्या काळात धरणावर जाण्यासाठी सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारच्या शूटिंगला कशी परवानगी दिली जाते? असा आक्षेप घेत शूटिंगची परवानगी देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री प्रमोद सावंत असल्याने , नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे पक्षाने केली आहे.

तसंच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. दोन महिन्यापूर्वी पूनम पांडे आपला पती सॅम बॉम्बे याच्यासह गोव्यात हनिमूनसाठी आली असताना सॅमने आपल्याला मारहाण केली आणि विनयभंग केला अशी तक्रार गोव्याच्या काणकोण पोलिसात दिली होती.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना आता हा नवा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने सरकार समोरची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची आणि योग्य वेळी कारवाई करणार असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली आहे.

First published:

Tags: Goa, Poonam pandey