उज्जैन, 31 जुलै: एका तरुणीनं धक्कादायक पाऊल उचलल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. स्वत:चं आयुष्य संपवण्यासाठी ही तरुणी इमारतीच्या छतावर चढली. हा संपूर्ण प्रकार शेजारच्यांनी पाहून तातडीनं पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली. या तरुणीच्या आत्महत्येचा प्रयत्न स्थानिक आणि पोलिसांचा सतर्कतेमुळे असफल झाला. तरुणीच्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
मध्य प्रदेशातील उज्जैन भागात एका तरुणीनं बाल्कनीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने या युवतीला वाचवलं आहे. ही युवतीचं मानसिक स्वास्थ ठिक नसल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे नाव सलोनी असून ती गुरुवारी एका अपार्टमेंटच्या बाल्कनीवर चढून आत्महत्येची धमकी देऊ लागली. आजूबाजूच्या लोकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. शेजारच्यांनी तातडीनं पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
#WATCH मध्य प्रदेश, उज्जैन: आत्महत्या की कोशिश कर रही एक लड़की को फायर ब्रिगेड ने सफलतापूर्वक बचाया।
SI प्रवीण पाठक ने बताया, "लड़की (सलोनी) खिड़की से निकलकर कूदने की कोशिश कर रही थी। फायर ब्रिगेड की मदद से उसे उतारा गया। वो मानसिक रोगी है।" pic.twitter.com/BJmB34eKKS
— ANI_HindiNews (@AHindinews) July 30, 2020
हे वाचा-मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय
पोलीस आणि अग्निशमन दलानं या तरुणीचं रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि तिला सुखरुप खाली उतरवलं. शेजार्यांच्या म्हणण्यानुसार, ही युवती अनेक महिन्यांपासून मानसिकदृष्ट्या त्रस्त आहे आणि ती आपल्या दुसर्या आईसोबत राहते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीवर मानसिक ताण होता. ती खिडकीतून जीव देण्याच्या तयारीत होती. स्थानिकांनी तिला समजावले तेव्हा जीव देण्याची धमकीही तिने दिली. तिने स्थानिकांचे ऐकले नाही. पुढे येऊ नका मी उडी मारने असेही सांगितले. पोलीस आणि अग्निशमन दलानं या तरुणीला सुखरुप रेस्क्यू केलं आहे.