जमशेदपूर 10 ऑगस्ट: झारखंड मधल्या जमशेदपूरमध्ये (Jamshedpur) होम क्वारंटाइन (Home Quarantine) असलेल्या एका पोलीस जवानाने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. या जवानाचं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं होतं. पोलीस कर्मचारी वसाहतीत तो पत्नीसोबत क्वारंटाइन होता. सोमवारी अचानक त्याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. त्यामुळे त्याच्या कुटुबीयांना मोठा धक्का बसला असून पत्नीची तर प्रकृतीच बिघडली आहे.
तरुण पांडे असं त्या पोलिसाचं नावं आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्याचा तो रहिवासी होती. एक उत्तम खेळाडू म्हणूनही तो ओळखला जात असे. नॅशन चॅम्पियन झाल्यानंतर त्याला थेट पोलीस विभागात नोकरी मिळाली होती. त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
तरुणंचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्यानंतर तो सुट्टीवरून परतला होता. त्यानंतर ते दोघे होम क्वारंटाइनमध्ये होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पहिल्या पतीचे नातेवाईक जीवावर उठले, घरात घुसून चाकूने वार करून महिलेला संपवले
पोलिसाची पत्नी या धक्क्यातून सावरल्यानंतर पोलीस तिची चौकशी करणार आहेत. घटनेच्या दिवशी नेमकं काय झाल? भांडणं झालं की तो कुठल्या अडचणीत होता याचीही चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती त्याच्या आई-वडिलांना दिली आहे. ते पालक आता जमशेदपूरला येणार आहेत.
मोठी कारवाई, तब्बल 1000 कोटींचे ड्रग्स जप्त,माफियाची पद्धत पाहून पोलीस हैराण
खेळाडूवृत्तीच्या पोलिसाने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याबद्दल त्याच्या मित्रांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. पत्नी दुसऱ्या खोलीत असतांना त्याने दार बंद करून गोळ्या झाडल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळ्यांच्या आवाज ऐकून आसपासचे शेजारीही धावत आले त्यावेळी तरुण हा रक्ताच्या धारोळ्यात पडला होता. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.