Home /News /national /

पाकिस्तानला पुरवायच्या भारतीय सैन्याची माहिती, अनेक दिवस नजर ठेवल्यानंतर 2 बहिणींना अटक

पाकिस्तानला पुरवायच्या भारतीय सैन्याची माहिती, अनेक दिवस नजर ठेवल्यानंतर 2 बहिणींना अटक

मध्य प्रदेशातील इंदूरजवळ लष्करी छावणी (Military Camp) महूमध्ये लष्करी हेरगिरीच्या (Military Espionage) आरोपाखाली दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या पाकिस्तानातील (Pakistan) व्यक्तींशी संपर्कात होत्या

    भोपाळ 22 मे : मध्य प्रदेशातील इंदूरजवळ लष्करी छावणी (Military Camp) महूमध्ये लष्करी हेरगिरीच्या (Military Espionage) आरोपाखाली दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोघी बहिणी आहेत आणि इंदूरच्या गवली पॅलासिया भागात त्या राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्या पाकिस्तानातील (Pakistan) व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि लष्करी छावणीबद्दलची माहिती त्या याठिकाणी पोहोचवत होत्या. काही दिवसांपूर्वी या महिला रस्त्यावर चालताना फोनवर बोलत होत्या. याचवेळी सैन्याच्या गुप्त विभागाने त्यांची फ्रिक्वेंसी पडकली. यानंतर या दोघींवरही सतत नजर ठेवण्यात आली. चार दिवसांपूर्वी इंटेलिजन्स ब्युरो, एटीएस आणि स्थानिक सैन्य गुप्तचर विभागाच्या टीमनं या दोघींच्या घरावर छापा टाकला. यानंतर इथे अनेक वाहनं येत राहिल्यानं लोकांना संशय आला. यामुळे, ही बातमी समोर आली. आता राष्ट्रीय इन्वेस्टिगेशन एजन्सीही त्यांची चौकशी करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार या दोघींची नावं कौसर आणि हिना अशी आहेत. दोघींची चौकशी केली जात आहे. या दोघींकडचे लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दोघींनाही मॉरिशसमधून फंडिंग होत असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघींचे वडील सैन्यात होते आणि नंतर त्यांनी इंदूरमधील एसबीआयच्या शाखेत सुरक्षारक्षक म्हणूनही काम केलं. त्यांचं निधन झालं आहे. या दोघी बहिणींनीही अनेक ठिकाणी नोकरी केली आहे. मात्र, कोणत्याच ठिकाणी त्या जास्त दिवस टिकून राहिल्या नाहीत. हिना महूमध्ये विजेच्या कंपनीत कॉन्ट्रॅक्टवर काम करत होती. या कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, हिना मागील सहा महिन्यांपासून प्राइम वन एजन्सीच्या माध्यमातून कॉमप्युटर ऑपरेटर म्हणून काम पाहात होती. मात्र, नंतर तिला कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. असं म्हटलं जातं आहे, की ती अनेक ठिकाणी काम करुन वेगवेगळी माहिती जमा करत होती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Military, Pakistan

    पुढील बातम्या