Home /News /national /

PNB Bank Scam: बँक फ्रॉडप्रकरणी CBI ला मोठं यश, नीरव मोदीचा सहकारी इजिप्तच्या कैरोमधून ताब्यात

PNB Bank Scam: बँक फ्रॉडप्रकरणी CBI ला मोठं यश, नीरव मोदीचा सहकारी इजिप्तच्या कैरोमधून ताब्यात

सीबीआयने एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत फरार उद्योगपती नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकर कैरोहून भारतात परत आणण्यात यश आलं आहे.

    मुंबई, 12 एप्रिल : सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन अर्थआत सीबीआयने (CBI) एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत फरार उद्योगपती, हिरे व्यापारी नीरव मोदीचा (Nirav Modi) सहकारी सुभाष शंकर (Subhash Shankar) इजिप्तच्या कैरोहून भारतात परत आणण्यात यश आलं आहे. तो नीरव मोदीचा जवळचा सहकारी होता. त्याला देशात परत आणण्यासाठी सीबीआय अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होती. अखेर यात यश मिळालं. बँक फसवणूक प्रकरणातील हा एक आरोपी आहे. सीबीआयने इजिप्तच्या कैरोमध्ये मोठं ऑपरेशन केलं असून PNB घोटाळ्यातील सुभाष शंकर या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 49 वर्षीय सुभाष शंकर 2018 मध्ये नीरव मोदीसोबत भारतातून पळून गेल्याची माहिती आहे. नीरव मोदीचा हा सर्वात खास होता. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय आता सुभाषला मुंबई न्यायालयात आणणार असून PNB घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहे. 2018 मध्ये इंटरपोलने पीएनबी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या विनंतीवरुन नीरव मोदी, त्याचा भाऊ विशाल मोदी आणि त्याचा जवळचा कर्मचारी सुभाष शंकर यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटिस जारी केली होती. चार वर्षांपूर्वी मुंबईच्या विशेष न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र आणि विशेष न्यायाधिश जे.सी जगदाळे यांनी जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे रेट कॉर्नर नोटिस जारी केली होती. नीरव मोदीने पीएनबीमध्ये 6500 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तो लंडनमधील तुरुंगात आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. ईडी नीरव मोदीच्या परदेशातील मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. नीरव मोदीने 2017 मध्ये त्याची कंपनी फायरस्टार डायमंडद्वारे आयकॉनिक रिदम हाऊस बिल्डिंग खरेदी केली होती. ही बिल्डिंग हेरिटेज प्रॉपर्टी करण्याचा त्याचा प्लॅन होता. पीएनबी बँकेत केलेल्या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांतून त्याने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्याची माहिती आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Nirav modi, Pnb bank

    पुढील बातम्या