नवी दिल्ली, 9 जानेवारी : मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus spike in India) झपाट्याने होताना दिसत आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 4.30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांसह काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. भारतात दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या आता 1 लाखांचा टप्पा ओलांडत आहे. त्यामुळे आता पंतप्रधान एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 1,59,632 नव्या कोरनोा बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे देशात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 5,90,611 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
PM Modi to chair a meeting to review the COVID-19 situation in the country at 4:30pm today: GoI sources
— ANI (@ANI) January 9, 2022
(file pic) pic.twitter.com/Snpm9q3Chw
भारतातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून अदिक जाला आहे. तर दुसरीकडे देशभरात लसीकरण मोहिम सुद्धा वेगाने सुरू आहे. भारतात आतापर्यंत 151.58 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. वाचा : बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. काय उपाययोजना राज्यांकडून सुरू आहेत तसेच आणखी काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंथन होणार आहे. सात दिवसांपूर्वी देशात कोरोनाची 27,553 इतक्या रुग्णांची नोंद झाली होती जी संख्या आता वाढून 1.6 लाख इतकी जाली आहे. इतक्या झपाट्याने होत असलेल्या रुग्णवाढीमुळे चिंतेचे वातवावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी 24 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणारी एक बैठक घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करत सावध राहण्याच्या सूचनांवर भर दिला होता. राज्यात कठोर निर्बंध कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर निर्बंध लागू (Restrictions imposed in Maharashtra) केले आहेत. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, मॉल आणि थिएटर रात्री 10 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. हे निर्बंध आणि नियम 10 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.