नवी दिल्ली, 29 जुलै: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (National Education policy) म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण आजपासून एक वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून (Central Government of India) जाहीर करण्यात आलं होतं. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क मिळावा तसंच शिक्षणाच्या धोरणात बदल करून अधिक प्रगत शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी हे धोरण केंद्र सरकारकडून मांडण्यात आलं होतं. त्यानुसार आज या धोरणाला एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शिक्षण समुदायाशी संवाद साधला. यावेळी अनेक महत्त्वाच्या विषयांबद्दल त्यांनी माहिती दिली.
या संवादादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आकलच्या युवा पिढीबाबत आणि विद्यार्थ्यांबाबत आपलं मत व्यक्त केलं. आजकालची युवा पिढी ही 21व्या शतकातील आहे. आजकालचे युवक स्वतःची व्यवस्था आणि स्वतःचं जग स्वतःच्या इच्छेनूसार बनवू इच्छितात; म्हणूनच अशा युवांना उभारी देण्यासाठी त्यांना जुन्या बंधनांतून आणि पिंजऱ्यांतून मुक्ती देणं महत्त्वाचं आहे असं मोदी म्हणाले.
तरुणांच्या भविष्याला उभारी
नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ युवकांना हा विश्वास देतं की देश आता त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्या इच्छा आणि आकांक्षासोबत आहे. देशात आर्टिफिशियल इंटेलीजेंसला (IA) सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे देशातील युवकांच्या भविष्याला नक्कीच उभारी मिळेल असंही पंतप्रधान म्हणाले.
हे वाचा - मेडिकल प्रवेशामध्ये OBC 27% तर EWSसाठी 10% आरक्षण; मोदी सरकारचा मोठा निर्णय
अभियांत्रिकी कॉलेजमध्ये स्थानिक भाषांमध्ये शिक्षण
मला आनंद आहे की, 8 राज्यांतील 14 अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये (Engineering colleges) 5 भारतीय भाषांत म्हणजेच हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, बांग्लामध्ये अभ्यासक्रम शिकवणार आहेत. तसंच सांकेतिक भाषांमध्येही शिक्षण सुरु करण्यात येणार आहे. अभियांत्रिकीच्या कोर्सचे 11 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी एक टूलही विकसित केलं आहे अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे.
भारतात सर्वोत्तम शिक्षणपद्धती
आपण नेहमी भारतातील विद्यार्थी बाहेर देशात शिक्षणासाठी जाताना बघतो. मात्र आता भारतातील शिक्षणपद्धती विकासित होणार आहे. जेणेकरून पुढे शिक्षणासाठी परदेशातून विद्यार्थी भारतात येतील आणि चांगल्या संस्था भारतात येतील अशी मोदींनी म्हंटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Modi government, Narendra modi