मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मोठी बातमी! मेडिकल प्रवेशामध्ये आता OBC 27% तर EWSसाठी 10% आरक्षण; मोदी सरकारचा निर्णय

मोठी बातमी! मेडिकल प्रवेशामध्ये आता OBC 27% तर EWSसाठी 10% आरक्षण; मोदी सरकारचा निर्णय

OBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे

OBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे

OBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे

नवी दिल्ली, 29 जुलै: OBC आरक्षणावरून (OBC Reservation) सध्या राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात विद्यार्थी भरडले जात आहेत. मात्र आता केंद्र सरकारकडून (Central Government) OBC आणि EWS प्रवर्गातील (OBC and EWS Reservation) विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा मेडिकलला प्रवेश (Medical Admissions) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या प्रवर्गात जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे (Ministry of Health and Family Welfare) हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशभरातील मेडिकलला प्रवेश घेणाऱ्या 5,000 - 5,500 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. एकीकडे या दोनही प्रवर्गातील आरक्षणाचा वाद सुरु असताना हा निर्णय घेत मोदी सरकारनं अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

कोणाला किती आरक्षण

केम्द्रा सरकारच्या या निर्णयानुसार OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षण मिळणार आहे तर EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. म्हणजेच इतके टक्के जागा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत.

कोणाला मिळणार फायदा

जे विद्यार्थी  MBBS, ME, BDS, MDS इत्यादी कोर्सेसच्या 2021-22 किंवा या नंतरच्या कोर्सेसला प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा फायदा  होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Central government, Education, Medical exams, Reservation