नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लॉकडाऊन काळात वांद्रे परिसरात हजारो परराज्यातील मजुरांचा मोठा जनसागर रेल्वे स्टेशन परिसरात धडकला होता. त्यांना आपापल्या राज्यात रेल्वेने घरी जायचं होतं. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. कोरोनाची पहिली लाट मुंबईत त्यावेळी प्रचंड फोफावत होती. अशावेळी एवढ्या मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर एकत्र जमल्याने देशभरात खळबळ उडाली होती. याच घटनेचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसने कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात मुंबईतील उत्तर भारतीय श्रमिकांना मोफत रेल्वे तिकीटे दिली. त्यामुळे मुंबईत धडकलेला कोरोना हा उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, उत्तराखंड सारख्या अनेक राज्यांमध्ये पसरला, असा घणाघात नरेंद्र मोदींनी केला. नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले? “कोरोना ही जागतिक महामारी आहे. पण त्याचाही राजकारणासाठी उपयोग केला गेला. हे मानवतेसाठी योग्य आहे? या कोरोना काळात काँग्रेसने तर हद्दच केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देश जेव्हा लॉकडाऊन लागू करत होता, सर्व तज्ज्ञ सांगत होते, जो जिथे आहे त्याने तिथेच थांबावं, संपूर्ण जगभरात हा संदेश दिला जात होता, कारण एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असेल आणि तो एकीकडून दुसरीकडे जाईल तर तो कोरोनाला सोबत घेऊन जाईल. तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी काय केलं? मुंबईच्या रेल्वे स्थानकावर उभं राहून मुंबई सोडून जाण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईत श्रमिकांना मोफत तिकीटे वाटले गेले. लोकांना प्रेरित केलं गेलं. जा, महाराष्ट्रात आमच्यावर जो भार आहे तो थोळा कमी करा. जा, तुम्ही उत्तर प्रदेशाचे आहात, बिहारचे आहात, जा तिथे कोरोना पसरावा”, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. ( पुण्यात तब्बल 1,77,500 रुपये प्रतिमहिना कमवण्याची संधी; ‘या’ भरतीसाठी करा अर्ज ) “तुम्ही हे खूप मोठं पाप केलं. तिथे अफरातफरीचं माहौल तयार केलं. तुम्ही आमच्या श्रमिक बंधू-बगीणींना अडचणीत टाकलं. त्यावेळी दिल्ली सरकारने संकट मोठं आहे, गावी जा, असं सांगितलं. त्यामुळे युपी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कोरोना पसरला. मानवजातवर संकट समयी हे कोणतं राजकारण आहे? काँग्रेसच्या या वागणुकीमुळे पूर्ण देश अचंबित आहे. देश खूप मोठ्या संकटाला सामोरं जात आहे. हा देश तुमचा नाहीय का? तुम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना चांगंलं आवाहन केलं असतं तर भाजप आणि केंद्र सरकारचं काय नुकसाण झालं असतं? काही लोकं कोरोना काळात मोदीच्या प्रतिमेला बाधा पोहोचण्याची वाट बघत होते. त्यांनी खूप वाट बघितली. तुम्ही इतरांना कमी लेखण्यासाठी महात्मा गांधीजींचा उल्लेख करतात”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतील संपूर्ण भाषण : ‘जर तुम्ही जमिनीशी जोडले असता, लोकांशी मिसळून राहिला असता तर लोकांच्या प्रश्न तुम्हाला दिसले असते. अनेक लोकांचे २०१४ पासून काटा अडकलेला आहे. त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला मिळाले. तुम्हाला अशा अवस्थेत अडकून ठेवलं आहे. काही लोकांना उशिरा कळालं, आता लोकांना जाणवत आहे’ अशी टीका मोदींनी केली. तसंच, ‘तुम्ही ५० वर्ष सरकार चालवलं. इथंच तुम्ही बसला होता. नागालँडच्या लोकांनी 1991 ला शेवटचे मतदान केले होते. आता २४ वर्ष झाली, १९९५ मध्ये ओडिशाच्या लोकांनी मतदान केले होते. गोव्यात १९९४ मध्ये पूर्ण बहुमतात तुम्ही सरकार आले होते. पण, नंतर लोकांनी नाकारलं. १९८८ मध्ये त्रिपुरामध्ये मतदान केलं होतं. मागे पश्चिम बंगालमध्ये १९७२ मध्ये काँग्रेसला पसंत केले होते. तामिळनाडूच्या लोकांनी १९६२ मध्ये तुम्हाला संधी मिळाली होती. तेलंगणा तयार करण्याचे श्रेय घेतात, पण लोकांनी तुम्हाला स्वीकारलं नाही. झारखंडमध्येही तुम्हाला स्वीकारलं नसून मागच्या दाराने प्रवेश करत आहात’ अशी कुंडलीच मोदींनी वाचून दाखवली. ‘प्रश्न निवडणुकांच्या निकालाचा नाही, लोकांच्या प्रश्नांचा आहे. इतके वर्ष सत्तेत राहिल्यानंतर लोकं तुम्हाला का नाकारत आहे. जरी तुम्ही प्रयत्न केले तरी लोकं तुम्हाला स्वीकारत नाही. आम्ही एक निवडणूक जरी हरलो तर इको सिस्टिम काय काय करते, इतका पराभव झाल्यानंतर तुमचा अहंकार जात नाही आणि तुमची इको सिस्टिम तुमचा अहंकार जाऊ देत नाही’ असा सणसणीत टोलाही मोदींनी लगावला. रंजन यांनी अनेक शेर सांगितले, चला मी सुद्धा एक शेर सांगतो, वो जोब दिन को रात कहे, तुरंत मान जाओ, नही मानोगें, दिन में नकाब ओढलेंगे, जरूरत हुई तो हकीकत थोडा बहोत मरोड लेगें, वो मग्रुर है खुद्द की समज पर बे इन्तहा, उन्हे आयना मत दिखाई, वो आयने को भी तोड देंगे’ अशी शायरी म्हणत मोदींनी सणसणीत उत्तर दिले. कोरोनाच्या काळानंतर जग नवीन व्यवस्थेकडे वळत आहे. आता आपण भारताच्या रुपाने या संधीला गमावले पाहिजे नाही. जगाच्या पाठीवर आपला आवाज कायम बुलंद राहिला पाहिजे. आपण पूर्ण सामार्थ्याने आणि संकल्पनेनं देशाला आपल्याला उंच ठिकाणी न्यायाचे आहे. कोरोनाच्या काळात अनेक बदल झाले आहे, आपण वेगाने पुढे जात आहोत. पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांना घरं मिळत आहे. आज गरिबांचे घर सुद्धा लाखोंच्या किंमतीपेक्षा जास्त बनत आहे. आज देशातील गरिबांच्या घरात शौचालय बनले आहे. आज गरिबांच्या बँकेत खाते आहे. आज देश अमृतमहोत्सव साजरा करत आहे, देश अमृतकाळात जात आहे. देशासाठी अनेकांनी आपल्या जीवाची आहुती दिली. त्यांचे बलिदान आज आठवण्याची वेळ आहे. आपण सर्व लोकशाहीला मानणारे लोक आहोत. त्यासाठी आपण प्रतिबंध आहोत. टीका करणे ही जीवंत लोकशाहीचे आभुषण आहे. पण, अंधविरोध हा लोकाशाहीचा अनादर आहे. भारताने जे काही मिळवले त्याचे स्वागत झाले पाहिजे. मागील दोन वर्षांमध्ये १०० वर्षांमधील कोरोनाचे मोठे संकट मानव जातीने पाहिजे. ज्यांनी भारताला कमी समजले, भारत लढा देऊ शकत नाही, असा दावा केला होता. पण भारताने कोरोना लस तयार केली आणि लढा दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.