Home /News /national /

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, पंतप्रधान मोदींनी चीन वादावर सोडलं मौन

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, पंतप्रधान मोदींनी चीन वादावर सोडलं मौन

' भारताला शांतता पाहिजे आहे. मात्र याचा अर्थ आम्ही दुर्बल आहोत असे नाही. सर्व देश हा शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे.'

    नवी दिल्ली 17  जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन सोबत सुरू असलेल्या वादावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू करण्यापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पंतप्रधानांसह सर्वच नेत्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. भारताची कुणी खोड काढली तर भारत योग्य उत्तर देण्यास सक्षम आहे. कुणीही शंका बाळगू नये असा इशाराही त्यांनी दिला. मोदी पुढे म्हणाले, भारताला शांतता पाहिजे आहे. मात्र याचा अर्थ आम्ही दुर्बल आहोत असे नाही. सर्व देश हा शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे. आमचे जवान हे लढतांना वीर गतीला प्राप्त झाले आहेत. आम्ही कधीच कुणाची खोड काढली नाही.  जगात आम्ही शांततेचा प्रसार केला. आमच्या प्रत्येक इंच जमीनीचं आम्ही रक्षण केलं. मात्र स्वाभीमान सोडला नाही. इतिहासही त्याचा साक्षीदार आहे असंही त्यांनी सांगितलं. भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत. सोमवारी झालेल्या हिंसाचारात चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर भारताचे 80 जवान जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. गलवात खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर त्याचा निषेध करण्यासाठी अनेक भागांमध्ये मोर्चे आणि काढण्यात आले. या हिंसाचारात जखमी झालेल्या 4 जवानांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या परिसरात 1962 साली 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. त्यामधून सोमवारी रात्री धुमश्चक्री झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडियानेही भारत-चीन प्रकरणाला महत्त्व दिल्याचं दिसून आलं. पाकिस्तानच्या डॉनपासून ते गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी यांनी कोणत्याही एका देशाची बाजू न घेता या प्रकरणावर भाष्य केलं. हेही वाचा - गलवान खोऱ्यात चीनशी दोन हात करताना आलं वीरमरण; 20 शहीदांची नावं जाहीर CSK संघातील 'या' व्यक्तीनं शहीद जवानांचा केला अपमान संकलन - अजय कौटिकवार
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या